(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तापसी म्हणजे कंगनाची 'सस्ती कॉपी', कंगनाच्या बहिणीचा थयथयाट
काही जण कंगनाची कॉपी करुन आपलं दुकान चालवतात. पण ट्रेलरचं कौतुक करताना तिचा साधा उल्लेखही केला नाही. तापसी, तू कंगनाची भ्रष्ट नक्कल करणं बंद कर' अशा शब्दात कंगनाची बहीण रंगोली चंदेलने तापसी पन्नूला लक्ष्य केलं.
तापसीचं ट्वीट वाचून रंगोलीचा तीळपापड झाला. 'काही जण कंगनाची कॉपी करुन आपलं दुकान चालवतात. पण एक गोष्ट ध्यानात घ्या. ट्रेलरचं कौतुक करताना तिचा साधा उल्लेखही केला नाही. कंगनाला 'डबल फिल्टर'ची गरज आहे, असं तापसीजी म्हणाल्याचं मी मागे ऐकलं. पण तापसी, तू तिची भ्रष्ट नक्कल करणं बंद कर' अशा शब्दात रंगोलीने तापसीला लक्ष्य केलं.This is so cool!!!! Always had high expectations out of this one n this looks so worth it ! 👏🏼👏🏼👏🏼👏🏼 #JudgementallHaiKya https://t.co/rpZcn7LHmC
— taapsee pannu (@taapsee) July 3, 2019
रंगोलीचा थयथयाट पाहून दिग्दर्शक अनुराग कश्यप तापसीच्या मदतीला धावून आले. 'कम ऑन रंगोली. हे फारच होतंय. ही कसली अधीरता. मला खरंच कळत नाही, काय बोलावं. तुझी बहीण आणि तापसी अशा दोघींसोबत मी काम केलं आहे. पण मला तुझं म्हणणं कळतच नाही. ट्रेलरचं कौतुक म्हणजे त्यातील प्रत्येक घटकाचं कौतुक. यात कंगनाचा समावेश होतो.' असं म्हणत कश्यप यांनी रंगोलीला समजावण्याचा प्रयत्न केला.Kuch log Kangana ko copy kar ke he apni dukaan chalate hain, magar pls note, they never acknowledge her not even a mention of her name in praising the trailer, last I heard Taapsee ji said Kangana needs a double filter and Tapsee ji you need to stop being a sasti copy 🙏 https://t.co/5eRioUxPic
— Rangoli Chandel (@Rangoli_A) July 3, 2019
रंगोली यावर शांत बसणारी नाही. 'तापसी कायम कंगनाला टोकाच्या भूमिकेबद्दल बोलत आली आहे' याकडे रंगोलीने लक्ष वेधलं. एकामागोमाग एक असे चार ट्वीट्स करत तापसीसह अनेकांवर तिने टीकास्त्र सोडलं. 'सगळे जण कंगनाचे चाहते आहेत आणि सगळ्यांना कंगनाला कॉपी करायला आवडतं. मात्र सर्वांचा शहाणपणा बाहेर काढायला मी आले आहे. सर्वांची पोलखोल करेन. कोणीही वाचणार नाही.' असा इशाराही तिने दिला.Come on Rangoli.. this is going too far.. this is really really desperate.. I really don’t know what to say to this . Having worked with both your sister and Taapsee .. I just don’t get this ..praising the trailer means praising all aspect of it. Which includes Kangana https://t.co/tkG5KwyFHi
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) July 3, 2019
Sir you can see it’s not about mentioning Kangana so much, clearly lot of people I have thanked haven’t mentioned her, it’s just that I am tired of people taking digs at her, who is this Taapsee to claim that Kangana needs double filter....(contd) @anuragkashyap72 https://t.co/YRSd3MhcYH
— Rangoli Chandel (@Rangoli_A) July 4, 2019
(Contd)....so now I am here showing everyone mirror.... I know you are working with her but please don’t get desperate without understanding the real issue ... back off @anuragkashyap72
— Rangoli Chandel (@Rangoli_A) July 4, 2019
You @anuragkashyap72 have been calling Kangana last night and telling Taapsee is her fan, give me one media interaction where she said that, infact she always calls Kangana extremist, Kangana has opinions so what? Why call her filter and extremist....(contd)
— Rangoli Chandel (@Rangoli_A) July 4, 2019
त्याच वेळी कंगनाने 'स्पॉटबॉय' या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत आपली बहीण रंगोली आपल्या रक्षणासाठी झगडत असल्याची प्रतिक्रिया दिली.(Contd)..Taapsee is a fan & loves to copy her yes we all are, who wouldn’t like to be like Kangana bt why attack her and take digs, yeh sab shanagiri nikalne keliye he toh main twitter pe ayi hun thank u very much magar sab ki pol khulegi koi nahin rok sakta 🙏 @anuragkashyap72
— Rangoli Chandel (@Rangoli_A) July 4, 2019