एक्स्प्लोर

Animal Movie: अजय- अतुलच्या गाण्याचा तडका अन् 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची जबरदस्त अॅक्टिंग; 'अॅनिमल'मधील 'या' गोष्टी तुमची मनं जिंकतील

Animal: सध्या अॅनिमल या चित्रपटामधील फायटिंग सीनची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या सीनमध्ये अजय-अतुलच्या एका मराठमोळ्या गाण्याचा वापर करण्यात आला आहे. 

Animal:  अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor)  'अ‍ॅनिमल' (Animal) हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. अनेकांनी हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. अॅनिमल या चित्रपटामधील रणबीरच्या अभिनयाचं देखील अनेकांनी कौतुक केलं आहे. सध्या अॅनिमल या चित्रपटामधील फायटिंग सीनची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या सीनमध्ये अजय-अतुलच्या एका मराठमोळ्या गाण्याचा वापर करण्यात आला आहे. 

अजय-अतुलच्या "डॉल्बी वाल्या" गाण्याचा  तडका 

अॅनिमल या चित्रपटाच्या एका फायटिंग सीनच्या बॅकग्राऊंडला अजय-अतुलचं "डॉल्बी वाल्या" हे गाणं ऐकू येतं. या सीनमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, रणबीरनं कानात हेडफोन घातले आहेत. या हेडफोनमध्ये "डॉल्बी वाल्या" हे गाणं लावलं आहे, अशातच रणबीर हा हे गाणं ऐकत फायटिंग करताना दिसत आहे. 

'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जबरदस्त अभिनय

अॅनिमल या चित्रपटात उपेंद्र लिमये या मराठमोळ्या अभिनेत्यांनी एक महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात उपेंद्र हे रणबीरला एक मशीन गन दाखवतात. जी मशीन गन महाराष्ट्रामध्ये असेंबल करण्यात आलेली असते. 

'अॅनिमल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

अॅनिमल हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेलाच कोट्यवधींची कमाई केलेली आहे.  Sacknilk च्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'Animal' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 61 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अॅनिमल या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे. अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल या कलाकारांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

रश्मिकानं प्रेक्षकांचे मानले आभार

रश्मिकानं नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, "तुम्ही आमच्या अॅनिमल या चित्रपटावर दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.. मला आशा आहे की, आम्ही तुम्हा सर्वांना खूप आनंदी केले असेल. कृपया तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा आणि आनंद घ्या!"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

संबंधित बातम्या:

Animal Box Office Collection Day 1: रणबीरच्या 'अॅनिमल' समोर पठाण, गदर अन् टायगर सुद्धा 'गार' पडला; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
Dharmendra Left Out Of Oscars 2026 In Memoriam Segment: 'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड
'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
Share Market : शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 75 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी दिलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
Embed widget