Anil Kapoor Workout Video: अनिल कपूर यांचा 66 व्या वर्षी तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस; मायनस 110 डिग्री तापमानात केला वर्कआऊट, व्हिडीओ व्हायरल
अनिल (Anil Kapoor) हे त्यांच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते वर्कआऊट करताना दिसत आहेत.
Anil Kapoor Workout Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) हे फिटनेस फ्रीक अभिनेत्यांपैकी एक आहेत. 66 वर्षाचे अनिस कपूर हे त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. अनिल हे त्यांच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते वर्कआऊट करताना दिसत आहेत.
अनिल कपूर यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते तोंडाला मास्क लावून मायनस 110 डिग्री तापमानात वर्कआऊट करताना दिसत आहेत. अनिल कपूर यांचा व्हिडीओमधील फिटनेस पाहून त्यांचे चेहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
अनिल कपूरच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी तसेच चाहत्यांनी कमेंट्स करुन त्यांचे कौतुक केले आहे. कपिल शर्मा कमेंट केली, 'वाह. मलाही करायचे आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'ये राज है आपकी जवानी का' यापूर्वी, अनिल कपूर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये ते ऑक्सिजन मास्क घालून ट्रेडमिलवर धावताना दिसत होते. अनिल कपूर हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अनिल हे त्यांच्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनिल कपूर यांचा चाहता वर्ग मोठा आहे.
View this post on Instagram
अनिल कपूर यांचे आगामी चित्रपट
अनिल कपूर हे लवकरच सिद्धार्थ आनंदच्या फायटर या चित्रपटात दिसणार आहेत. यामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अनिल कपूर हे रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटाचाही एक भाग आहेत, ज्याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा करत आहेत. काही दिवसांपूर्वी अनिल कपूर हे त्यांच्या जुग जुग जियो या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यांच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Anupam Kher Latest Video: अनुराग बासुने अनुपम खेर यांच्यासाठी बनवला 'अंडा डोसा'; व्हिडीओ व्हायरल