Anil Kapoor Birthday Special : राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये नोकरी ते ‘मिस्टर इंडिया’, अनिल कपूर यांचा भन्नाट जीवनप्रवास
Anil Kapoor Birthday Special : आपल्या स्टाईलने आणि डान्सने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या अनिल कपूर यांचा आज 65 वा वाढदिवस. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल खास गोष्टी...
Anil Kapoor Birthday Special : 'माय नेम इज लखन' गाणं ऐकलं की डोळ्यासमोर येतात बॉलिवूडचे एव्हर ग्रिन हिरो अनिल कपूर (Anil Kapoor). आपल्या स्टाईलने आणि डान्सने अनिल नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतात. आज त्यांचा 65 वा वाढदिवस. त्यांच्या चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त जणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी...
अनिल कपूर यांचा जन्म 24 डिसेंबर 1956 साली झाला. त्यांचे वडील सुरिंदर कपूर हे चित्रपट निर्माता होते. पण बॉलिवूडमध्ये अनिल कपूर यांना विशेष ओळख निर्माण करण्यासाठी स्ट्रगल करावा लागला होता. अनिल कपूर हे राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये काम करत होते. त्यांनी उमेश मेहरा यांच्या ‘हमारे तुम्हारे’या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘हम पांच’आणि‘शक्ति’या चित्रपटांमध्ये सपोर्टिंग रोल अनिल यांनी केला. मिस्टर इंडिया या चित्रपटामुळे अनिल यांना विशेष ओळख मिळाली. या चित्रपटातील अनिल आणि श्रीदेवी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
अनिल कपूर यांच्या आधी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांना मिस्टर इंडिया या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेची ऑफर शेखर कपूर यांनी दिली होती. अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिली. त्यानंतर या चित्रपटात काम करण्याची संधी अनिल कपूर यांना मिळाला.
View this post on Instagram
तेजाब,बेटा, विरासत, ताल, पुकार, नो एंट्री यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये अनिल कपूर यांनी काम केले आहे. त्यांच्या राम लखन, जुदाई,नायक, दिल धड़कने दो, वेलकम या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
हे ही वाचा :
Bollywood Actress : आलिया, प्रियांका अन् कतरिना... एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेतात 'या' अभिनेत्री