Anil Kapoor : लडाखमधील 'त्या'मुलीच्या नावावरून अनिल कपूर यांनी आपल्या मुलीचे केले नामकरण; कारण समजताच 'बिग बी' झाले हैराण
Anil Kapoor Sonam Kapoor : लडाखमधील एका मुलीच्या नावावरून अनिल कपूर यांनी आपल्या मुलीचे नाव सोनम ठेवले. स्वत: अनिल कपूर यांनी हे नाव ठेवण्यामागील कारण सांगितले.

Anil Kapoor Sonam Kapoor : वडील अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनम कपूरने (Sonam Kapoor) देखील सिनेसृष्टीत प्रवेश केला. सोनम कपूरने साकारलेल्या काही भूमिकांचे प्रेक्षकांनीदेखील कौतुक केले. अनिल कपूर यांनी आपल्या मुलीचे नाव सोनम ठेवण्यामागे एक कारण आहे. लडाखमधील (Ladakh) एका मुलीच्या नावावरून अनिल कपूर यांनी आपल्या मुलीचे नाव सोनम ठेवले. स्वत: अनिल कपूर यांनी हे नाव ठेवण्यामागील कारण सांगितले.
अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये अनिल कपूर यांनी मुलीचे नाव सोनम ठेवण्यामागील ही गोष्ट सांगितली.जेव्हा अमिताभ यांनी अनिल कपूर यांना सोनम नाव ठेवण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी एक घटना सांगितली.
कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये खेळताना अमिताभ बच्चन यांनी अनिल कपूर यांना एक प्रश्न विचारला होता. यामध्ये कोणत्या पदार्थाचा अर्थ सोनं असा होतो. या प्रश्नाच्या उत्तराच्या पर्यायात सोनम हा शब्ददेखील होता. त्यावेळी अनिल कपूर यांनी आपल्या मुलीच्या नावाचा अर्थ सोनं असा होतो हे माहित नसल्याचे सांगितले. हे ऐकताच अमिताभ बच्चन यांनाही धक्का बसला. मग, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी अनिल कपूर यांना काय विचार करून मुलीचे नाव सोनम असे ठेवले असा प्रश्न केला.
सोनम नाव का ठेवले? अनिल कपूर यांनी सांगितले
अनिल कपूर यांनी उत्तर देताना म्हटले की, 'मी फारसा विचार केला नव्हता. मी लडाखमध्ये 'जोशिले'चित्रपटाचे शूटिंग करत होतो. तिथे एक मुलगी होती, सोनम. ती खूप छान मुलगी होती, खूप गोड आणि दिव्यांग होती. मला ती मुलगी खूप आवडायची, ती खूप निरागस दिसत होती. तर मी म्हणालो की मला मुलगी झाली तर तिचे नाव सोनम ठेवीन. लडाखमध्ये सोनमचा अर्थ शुभ असा होतो.
View this post on Instagram
अनिल कपूर यांच्या फिटनेसची चर्चा
अनिल कपूर यांच्या फिटनेस खूप चर्चा होत असते. आपल्या फिटनेसबाबत ते खूपच सजग आहेत. वयाच्या 67 व्या वर्षीही तरुण दिसतात. नुकत्याच रिलीज झालेल्या फायटर चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्याशिवाय, अॅनिमल चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती.तर, सोनम कपूरने मागील वर्षी 2023 ब्लाइंड चित्रपटात दिसली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
