Angad Bedi Post: "त्यांनी कित्येक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे"; बिशनसिंह बेदी यांच्या निधनानंतर अंगद बेदीनं शेअर केली भावनिक पोस्ट
Angad Bedi Post: अंगद बेदी (Angad Bedi) आणि नेहा धुपिया यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Angad Bedi Post: माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी (Bishan Singh Bedi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिशनसिंह बेदी यांच्या निधनानंतर बेदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बिशनसिंह बेदी यांचा मुलगा अंगद बेदी (Angad Bedi) याने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच अंगद बेदीची पत्नी नेहा धुपियानं देखील भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अंगद आणि नेहा यांनी शोक व्यक्त केला आहे.
अंगद आणि नेहाची पोस्ट
अंगद आणि नेहा यांनी सोशल मीडियावर बिशनसिंह बेदी यांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच एक भावनिक पत्र देखील अंगद आणि नेहा यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. यामध्ये लिहिलं आहे, 'आम्ही शॉकमध्ये आहोत. दु:खावर मात करत असताना आम्हाला हा विचार करुन समाधान मिळत की, ते अनेकांना प्रेरणा देणारे समृद्ध, निर्भय आणि परिपूर्ण जीवन जगले आहेत. आम्हाला मिळालेल्या प्रेमाच्या संदेशासाठी आम्ही सर्वांचे आभार मानतो . बाबांनी कित्येक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे, हे पाहणे खूप आनंददायी आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा कुटुंबासोबत घालवला तसेच त्यांनी त्यांचे आयुष्य हे वाहेगुरूंच्या सेवेत घालवले आहे. निर्भाऊ-निर्वैर जीवन याचे ते प्रतीक होते. ते आता त्याच्या प्रिय व्यक्तीसोबत आहे हे जाणून आम्हाला दिलासा मिळतो. बाबा, तुम्ही आमचे निर्भिड लिडर आहात, याच आम्हाला धन्यता वाटते. "निरीक्षण आणि आत्मसात करणे" या तुमच्या ब्रीदवाक्यानुसार जगण्याचा प्रयत्न आम्ही करू. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत रहा.'
View this post on Instagram
बिशन सिंग बेदी यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करून शोक व्यक्त केला. अभिनेता शाहरुख खाननं ट्वीट शेअर करुन बिशनसिंह बेदी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "आपण आपल्या सभोवताली पाहतो आणि अनुभवतो की, काही लोकांच्या उत्साहाने आणि निखळ कृपेमुळे आपण मोठे झालो आहोत. बिशनसिंह बेदी हे त्यापैकी एक होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. सरांनी आम्हाला खेळ आणि जीवनाबद्दल खूप काही शिकवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सर, तुमची खूप आठवण येईल."
इतर महत्वाच्या बातम्या: