(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video: फुलबाजीच्या पाकिटावर तुटून पडली, स्वत:चा फोटो पाहून झाली शॉक, अनन्या पांडेची Reaction पहा..
अनेक चाहते तिच्या क्यूट रिॲक्शवर भन्नाट प्रतिक्रीया दिल्यात, तर घरच्यांनी आता तू चमकलीस असं म्हणत तिचं कौतूक केलंय.
Ananya Pandey Reaction: यंदाचा आठवडा मनोरंजनसृष्टीत नवनव्या लुकचा, प्रमोशन, पुजा आणि कुटुंबासमवेत घालवलेल्या खास क्षणांचा ठरला आहे. आता दिवाळी संपली असली तरी बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री अनन्या पांडेचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. यात अनन्याचा फोटो फुलबाजीच्या पाकिटावर दिसतोय. हे फुलबाजीचं पाकीट तिला दाखवले असता आश्चर्याचा धक्का बसलेल्या अनन्यानं तिच्या आईला मी फुलबाजीच्या पाकिटावर आल्याचं सांगितलं. आणि हे माझं स्वप्न होतं असं म्हणत घरातील सगळ्यांना तिनं फुलबाजीच्या पाकीटावर आल्याचं सांगितलं. तिची ही रिॲक्शन सध्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरली आहे.
अनेक चाहते तिच्या क्यूट रिॲक्शवर भन्नाट प्रतिक्रीया दिल्यात, तर घरच्यांनी आता तू चमकलीस असं म्हणत तिचं कौतूक केलंय.
फुलबाजीच्या पाकिटावर अनन्या झळकली
दिवाळी संपली असली तरी अनन्या पांडे आता खऱ्या अर्थाने चमकल्याचं दिसत आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून फुलबाजीच्या पाकिटावर स्वत:चा फोटो पाहून आश्चर्यचकीत झालेली अनन्या तिच्या घरातल्यांना, विशेष करून आईला फुलबाजीवर माझा फोटो असल्याचं सांगताना दिसतेय. दिवाळीच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवत बसलेल्या अनन्यासमोर तिची बहीण फुलबाजीचं पाकीट घेऊन येते. यावेळी आपलाच फोटा पाकिटावर दिसल्यानं अनन्याला शॉक बसतो. हे माझं स्वप्न होतं असं म्हणत ती घरातील सगळ्यांना सांगते तिचा फोटो फुलबाजीच्या पाकिटावर आल्याचं!
View this post on Instagram
फुलबाजीच्या पाकिटावर आलात म्हणजे तुम्ही खरे चमकलात
फुलबाजीच्या पाकिटावर अनन्याचा फोटो झळकल्यानंतर ती घरच्यांना ते पाकीट दाखवत माझा फोटो फुलबाजीच्या पाकिटावर आल्याचं सांगते. तेंव्हा तिचे काका म्हणतात, आता खऱ्या अर्थानं तू आली आहेस. जर फुलबाजीवर झळकलीस तर खरी चमकलीस. अशी टिप्पणी ते करतात. या पाकिटासोबत ती घरच्यांसोबत फोटो काढतानाही या व्हिडिओत दिसत आहे.
चाहत्यांच्या या व्हिडिओवर गोड प्रतिक्रीया
अनन्या पांडे चंकी पांडेची मुलगी असूनही फुलबाजीवर स्वत:च्या हिमतीवर ती झळकली अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रीया चाहते तिच्या या व्हीडिओवर दित आहेत. अनन्या खूप गोड असल्याचं चाहत्यांनी या पोस्टवर खाली लिहिलं आहे.
हेही वाचा:
डोकं सुन्न करणारा सस्पेन्स, अंगावर शहारे आणणारे सीन्स; बॉलिवूडचे 'हे' 7 चित्रपट तुम्ही पाहाच!
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ