एक्स्प्लोर

Anant Ambani Radhika Merchant : अंबानींची बातच न्यारी! अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला बॉलिवूड बंद! आलिया-रणबीर ते सलमान-धोनीपर्यंत; दिग्गज मंडळी इटलीला रवाना

Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला बॉलिवूड पुन्हा एकदा बंद असणार आहे. अनेक दिग्गज मंडळी मुकेश अंबानी यांचा मुलाच्या कार्यक्रमासाठी इटलीला रवाना झाले आहेत.

Anant Ambani Radhika Merchant Second Pre Wedding : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जुलै महिन्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. मार्च महिन्यापासून त्यांच्या प्री-वेडिंगला सुरुवात झाली आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये मार्च महिन्यात तीन दिवस ग्रँड प्री-वेडिंग पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा अनंत-राधिका दुसऱ्यांदा प्री-वेडिंग फंक्शन इटलीतील क्रूजवर करायला सज्ज आहेत. अनंत-राधिकाच्या क्रूज पार्टीसाठी बॉलिवूडदेखील पुढील काही दिवसांसाठी बंद असणार आहे. सलमान खानपासून (Salman Khan) आलिया भट्ट (Alia Bhatt) ते रणबीर कपूरपर्यंत (Ranbir Kapoor) अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमासाठी इटलीला रवाना झाले आहेत.  

अनंत-राधिकाच्या सेकंड प्री-वेडिंगला आलिया-रणबीर रवाना

एअरपोर्टवर सर्वात आधी रणबीर कपूर, आलिया भट्ट आपली लेक राहासोबत स्पॉट झाले. आलिया आणि रणबीर अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. यंदा अनंत-राधिकाच्या सेकंड प्री-वेडिंगला ते लेक राहासोबत हजेरी लावणार आहेत. रणबीर, आलिया आणि राहासोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्याचे खास मित्र अयान मुखर्जीदेखील दिसून आले. बॉलिवूडच्या सर्व कलाकारांना मुंबईतील एका प्रायव्हेट एअरपोर्टवर इटलीला जाण्याआधी स्पॉट करण्यात आलं. फोटोमध्ये रणवीर एका नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसून आला. त्याने मॅचिंग स्वेटशर्ट आणि राखाडी रंगाचे जॉगर्स परिधान केले होते. तर आलिया भट्टनेही कॅज्युअल लूक केला होता. तसेच तिने आपले केस बांधले होते. राहासोबत ती आपल्या आलिशान गाडीतून बाहेर पडताना दिसून आली. पुढे रणबीरने आपल्या लाडक्या लेकीला कडेवर घेतलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं दुसरं प्री-वेडिंग 28 ते 30 मे दरम्यान पार पडणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील (Salman Khan) या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. सलमानलादेखील एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आहे. पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये भाईजान खूपच हँडसम दिसत होता. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला 

एम एस धोनी सहकुटुंब रवाना 

क्रिकेटर एमएस धोनी आपली लेक जीवा आणि पत्नी साक्षी धोनीसह अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला रवाना झाला आहे. धोनीला सहकुटुंब एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. रणवीर सिंहदेखील (Ranveer Singh) रवाना झाला आहे. पांढरा टी-शर्ट, ब्लॅक लॉन्ग जॅकेट आणि ब्लॅक ट्रॉउजरमध्ये त्याला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. 

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी सध्या प्रत्येकजण उत्सुक आहे. गुजरातमध्ये झालेल्या पहिल्या प्री-वेडिंग फंक्शनला आतंरराष्ट्रीय गायिका रेहानासह दिलजीत दोसांझ, सलमान, शाहरुख आणि आमिर खानसह अनेक कलाकार सहभागी झाले होते. आता अनंत-राधिकाच्या प्रे-वेडिंगला शकीराचा परफॉर्मन्स असू शकतो, असे म्हटले जात आहे. तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील प्री-वेडिंगला परफॉर्म करताना दिसतील.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता! किंग खान दिवसाला कमावतोय 10 कोटी रुपये; जाणून घ्या KKR टीमचा मालक शाहरुखच्या नेटवर्थबद्दल...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines  10 PM TOP Headlines 17 June 2024ABP Majha Marathi News Headlines  9 PM TOP Headlines 17/6/ 2024Pankaja Munde Speech Beed : लक्ष्मण हाकेंच्या मंचावर पंकजा मुंडे, ओबीसी आरक्षणावर स्फोटक भाषणPankaja Munde Meet Sachin Family : भावनिक होऊन टोकाचं पाऊल उचलू नका, पंकजा मुडेंचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
मतमोजणीचा वाद रंगला, आता ठाकरेंच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; रवींद वायकरांची होती तक्रार
मतमोजणीचा वाद रंगला, आता ठाकरेंच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; रवींद वायकरांची होती तक्रार
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
Embed widget