एक्स्प्लोर

Amruta Deshmukh Prasad Jawade : 'बिग बॉस'च्या घरात जडलं प्रेम; 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख अन् प्रसाद जवादे आज अडकणार लग्नबंधनात

Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Update : अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे आज लग्नबंधनात अडकणार आहेत.

Amruta Deshmukh Prasad Jawade : 'पुण्याची टॉकरवडी', 'बिग बॉस'फेम (Bigg Boss) अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे दोघेही मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. अमृता अभिनेत्री असण्यासोबत आरजेदेखील आहे. 98.3 मिर्चीमराठीवर एफएमवर तिचा 'टॉकरवडी' हा शो आहे.

अमृता आणि प्रसादची लव्हस्टोरी जाणून घ्या... (Amruta Deshmukh Prasad Jawade Love Story)  

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. या पर्वातील त्यांची रोमँटिक केमिस्ट्री चांगलीच गाजली. आता त्यांची ही केमिस्ट्री खऱ्या आयुष्यात सत्यात उतरली आहे. अखेर आज अमृता आणि प्रसाद थाटामाटात लग्नबंधनात अडकणार आहेत. 

अमृता आणि प्रसाद 'बिग बॉस'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. पण या पर्वात त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबूली दिली नाही. अखेर एकदिवस साखरपुड्याचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं. 

अमृता आणि प्रसाद 'या' ठिकाणी अडकणार लग्नबंधनात (Amruta Deshmukh Prasad Jawade Weddung Venue)

अमृता आणि प्रसादच्या लग्नाची थीम 'बिग बॉस' असेल असा चाहत्यांचा अंदाज होता. पण अमृता आणि प्रसादचा लग्नसोहळा मात्र मोकळ्या जागेत होणार आहे. लग्नासाठी त्यांनी एक ओपन रिसॉर्ट बूक केलं आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येणार आहे. एकंदरीतच निसर्गाच्या सानिध्यात अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत. 

अमृता देशमुखने शेअर केलेल्या ग्रहमखाच्या फोटोपासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मेहंदी, हळद आणि संगीताचा कार्यक्रमही जल्लोषात पार पडला आहे. या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. तसेच आता त्यांच्या लग्नसोहळ्यातही अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. 

अमृता-प्रसादची हटके लग्नपत्रिका

अमृता आणि प्रसादच्या लग्नपत्रिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बिग बॉसची थीम असणाऱ्या या पत्रिकेत अमृताने लिहिलेली कविताही आहे. प्रसाद-अमृताच्या गोड लव्हस्टोरीबद्दल भाष्य करणारी ही कविता आहे. 

अमृताची कविता काय आहे? 

समांतर असा सुरू होता 
त्या दोघांचा प्रवास..
अनपेक्षित क्षणी आला 
सक्तीचा सहवास!

भिन्न स्वभाव, भिन्न विचार, 
प्रेमावर मात्र दृढ विश्वास..
आधी त्याने घेतला हातात हात
मग तिने सोडली नाही कधीच साथ..!

दोन मनांचा सुरू झाला होता Experimental संवाद..
मात्र Permenant सुखी जीवनासाठी हवेत आता..फक्त तुमचे आशीर्वाद...!

संबंधित बातम्या

Amruta Deshmukh Prasad Jawade : मेहंदी है रचने वाली... अमृता देशमुखच्या हातावर रंगली प्रसाद जवादेच्या नावाची मेहंदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
Crime News: रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
Beed Crime : खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Budget Session 2025 | महायुतीचा बजेट मांडताना अजितदादांसमोर कोणती आव्हानं? ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 01.00 PM TOP Headlines 01.00 PM 10 March 2025Chhagan Bhujbal on Onion : कांदा प्रश्नावरून भुजबळ विधानसभेत आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांनी कांदाप्रश्न केंद्रांसमोर मांडावाABP Majha Marathi News Headlines 12.00 PM TOP Headlines 12.00 PM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
Crime News: रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
Beed Crime : खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
Nitesh Rane : मोठी बातमी : आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट,  हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरण
मोठी बातमी : आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट, हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरण
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारी - मार्चचे मिळून 3000 रुपये कधीपर्यंत मिळणार? आदिती तटकरेंनी अपडेट सांगितली
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी - मार्चचे मिळून 3000 रुपये कधीपर्यंत मिळणार? आदिती तटकरेंनी अपडेट सांगितली
Raj Thackeray Kumbh Mela: राज ठाकरेंना फक्त हिंदू धर्म दिसतो, बकरी ईदला मोहम्मद अली रोडवर वाहणारं लाल पाणी दिसत नाही; नितेश राणे कडाडले
राज ठाकरेंना फक्त हिंदू धर्म दिसतो, बकरी ईदला मोहम्मद अली रोडवर वाहणारं लाल पाणी दिसत नाही; नितेश राणे कडाडले
Chhagan Bhujbal : कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणनमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले...
कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणनमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले...
Embed widget