एक्स्प्लोर

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

Raj Thackeray and PM Modi: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतर येथे आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी (Delhi Police) सोमवारी बेछूट लाठीमार केला होता. या सगळ्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांना धारेवर धरले आहे.  (Delhi Protest news)

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

केंद्र सरकारने शनिवार 18 जुलै 2026 ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे .

मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं. 

बातम्या व्हिडीओ

Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 October 2026: आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? कोणाला टेन्शन? आजचे राशीभविष्य..
आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? कोणाला टेन्शन? आजचे राशीभविष्य..
राज्यात उन्हाळा आहे की पावसाळा! सूर्य नारायण तळपतोय, पारा वाढतोय, कोणत्या भागात किती तापमानाची नोंद?
राज्यात उन्हाळा आहे की पावसाळा! सूर्य नारायण तळपतोय, पारा वाढतोय, कोणत्या भागात किती तापमानाची नोंद?
मालकानं नोकरीवरुन काढलं, राग झाला अनावर, कर्मचाऱ्याने थेट गॅरेजलाच लावली आग, 20 दुचाकी जळून खाक, लाखो रुपयांचा फटका
मालकानं नोकरीवरुन काढलं, राग झाला अनावर, कर्मचाऱ्याने थेट गॅरेजलाच लावली आग, 20 दुचाकी जळून खाक, लाखो रुपयांचा फटका
विक्रमी घरभाडं! 2 BHK साठी 70 हजार रुपये भाडे तर 4 लाख रुपये डिपॉझिट, भारतातील कोणत्या शहरात एवढी महागाई?
विक्रमी घरभाडं! 2 BHK साठी 70 हजार रुपये भाडे तर 4 लाख रुपये डिपॉझिट, भारतातील कोणत्या शहरात एवढी महागाई?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
Rahul Gandhi On Election Commission : लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
CJP Mumbai Protest : सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Embed widget