एक्स्प्लोर

तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची आठवण सांगत आपल्या राजकीय प्रवेशाचे कारण अजित दादा तुम्हीच होतात, असे म्हटले.

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांची आज पहिलीच जयंती. सहा महिन्यांपूर्वी अजित पवारांचे विमान दुर्घटनेत अकाली निधन झाले. 28 जानेवारीच्या सकाळी सकाळी अवघ्या महाराष्ट्राची झोप उडवून देणारी घटना माध्यमांतून समोर आली, ती म्हणजे अजित पवारांचे निधन. बारामतीजवळ अजित दादांचे विमान क्रॅश झाले अन् अवघा महाराष्ट्र सुन्न झालं, सोशल मिडिया भावूक झाला, अनेकांच्या डोळे पाणावले, बडे नेतेही धाय मोकलून रडू लागले. आज 22 जुलै रोजी अजित पवारांचा सर्वत्र वाढदिवस साजरा केला जायचा. मात्र, आज त्यांची जयंती साजरी होत असल्याने अनेक नेते भावूक झाले आहेत, अनेक नेत्यांनी (Dilip sopal) दांदांच्या आठवणी जागवल्या आहेत.  
 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची आठवण सांगत आपल्या राजकीय प्रवेशाचे कारण अजित दादा तुम्हीच होतात, असे म्हटले. तर, ज्येष्ठ नेते तथा ठाकरेंच्या शिवसेनेतील बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही अजित दादांची उणीव शब्दात व्यक्त करता येणार नसल्याचे म्हटले.  

अमोल कोल्हेंनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, आजचा दिवस खरंतर आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस, पण  आज आपण आमच्यात नाहीत ही जाणीवच अस्वस्थ करुन टाकते. दीर्घायुष्याच्या शुभेच्छा  देण्याच्या दिवशी आज आपल्याला आदरांजली वहावी लागतेय ही भावना वेदनादायी आहे. दादा आपले शिस्तप्रियता, विकासाभिमुख दृष्टिकोन, वक्तशीरपणा आणि आपल्या माणसांबद्दल असलेला आपलेपणा हे स्वभावगुण कायमच मनाला भावले. खरंतर आपल्यामुळेच मी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले, अशी आठवण देखील कोल्हेंनी सांगितली. महाराष्ट्रातील माझ्या सर्वात प्रिय नेत्यांपैकी आपण आहात. दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अत्यंत आपुलकीचा संवाद व्हायचा, आपलं भरभरून प्रेम मिळायचं. यावर्षी त्या संवादाची, त्या प्रेमाची उणीव प्रकर्षाने भासतेय, अशी पोस्ट खासदार कोल्हे यांनी व्यक्त केली. 

दिलीप सोपल यांची भावनिक पोस्ट

अजित पवारांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना भावूक झालेले बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही अजित पवारांच्या जयतीनिमित्त त्यांची आठवणी जागवली. दादा, तुमची उणीव शब्दांत व्यक्त करता येणार नाही, असे सोपल यांनी सोशल मीडियातून म्हटलं आहे. तर, यापूर्वी अजित पवारांचा उल्लेख करताना सोपल यांनी अजित दादा म्हणजे वेगळं रसायन असल्याचं म्हटलं होतं. अजित दादा म्हणजे, रंगूनी साऱ्या रंगात रंग माझा वेगळा, गुंतूनी साऱ्या गुंत्यात पाय माझा मोकळा.. असं अजब रसायन असल्याचे सांगत आमदार सोपल यांनी दादांची राजकीय उंची व्यक्त केली होती.  

हेही वाचा

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Manoj Jarange Patil at Jantar Mantar: मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, 'माझी हिंदी ऐकाल तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
Embed widget