एक्स्प्लोर
करीनाच्या प्रेग्नन्सीवर सैफच्या पहिल्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री करीना कपूरच्या प्रेग्नन्सीची जोरदार चर्चा आहे. स्वत: सैफ अली खाननेही या करीनाच्या प्रेग्नन्सीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. करीना आणि मी लवकरच आई-बाबा बनणार असून येत्या डिसेंबर महिन्यात आमच्या पहिल्या बाळाचं आगमन होणार आहे.
करीना कपूर पहिल्यांदाच आई होणार असली तर सैफ आधीच दोन मुलांचा बाबा आहे. पहिली पत्नी अमृता सिंह आणि त्याला इब्राहिम आणि सारा ही दोन मुलं आहेत. आता करीनाच्या प्रेग्नन्सीबाबत समजल्यावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावर होत आहे. पण यावर सैफची पहिली पत्नी अमृताची काय प्रतिक्रिया आहे, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.
करिनाच्या घरी कुणी तरी येणार येणार गं, सैफची घोषणा
परंतु करीनाच्या प्रेग्नन्सीविषयी आपल्याला काहीच देणं-घेणं नसल्याचं तसंच काहीही फरक पडत नसल्याचं अमृताच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे. मीडियाने अमृताला फोनवरुन याबाबतच विचारलं असता ती चिडलेली आणि रागावलेली दिसली. अमृता म्हणाली की, "कॉल करुन मला असे प्रश्न विचारण्याची तुमची हिम्मतच कशी झाली? कोण आहात तुम्ही? मला पुन्हा कॉल करु नका." अमृताचे हे शब्द ऐकून तिला करीनाच्या गूड न्यूजविषयी कोणताही फरक पडत नसल्याचं दिसत आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
