एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले; म्हणाले,"ऐश्वर्या तुमची सून असूनही तुम्ही..."

Amitabh Bachchan Post : अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. बिग बींनी सूनेकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा घटस्फोट (Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce) होणार असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. बच्चन कुटुंबात सध्या आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. बच्चन कुटुंबीय काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबाचा भाग असलेल्या ऐश्वर्या रायसोबत काहीही बोलताना दिसून येत नाहीत. एकंदरीतच बच्चन कुटुंबियांकडून ऐश्वर्या रायकडे दुर्लक्ष केलं जात आहे. अशातच आता अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांकडून प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट काय? (Amitabh Bachchan Post) 

अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे,"हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. आजही या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद आणि प्रेम मिळतं. मंचावर लाईव्ह सादरीकरण केलं होतं ती बेस्ट मोमेंट होती". 'बंटी और बबली' (Bunty Aur Babli) या चित्रपटातील हे गाणं होतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) मुख्य भूमिकेत होते. तर ऐश्वर्या रायदेखील (Aishwarya Rai) या चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून झळकली होती. 

अमिताभ बच्चन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी ऐश्वर्या रायचा उल्लेख केलेला नाही. तसेच तिला टॅगदेखील केलेलं नाही. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे की,"ऐश्वर्या राय या गाण्यात मुख्य डान्सर होती. तर तुम्ही दोघे सहाय्यक डान्सर होतात". दुसऱ्याने लिहिलं आहे,"या गाण्यात ऐश्वर्या रायदेखील आहे. तरी तुम्ही तिला टॅग केलेलं नाही. फक्त तुम्ही तुमच्या मुलालाच टॅग केलं आहे. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय जेव्हा तुम्हाला तिला साईडलाइन करताना पाहतो तेव्हा खूप दु:ख होतं. ऐश्वर्या प्रचंड हुशार आहे".

श्वेतालाही केलेलं ट्रोल

अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याकडे दुर्लक्ष करण्याआधी पॅरिस फॅशन वीकमध्ये श्वेता बच्चनने तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या आणि बिग बींची नात नव्या नवेदी नंदाने हजेरी लावली होती. त्यावेळी अमिताभ यांनी फक्त नव्या नंदाबद्दल भाष्य केलं होतं. तर ऐश्वर्या रायच्या इव्हेंटमध्येही हजेरी लावली नाही ना तिच्याबद्दल काही भाष्य केलं. त्यावेळी नेटकऱ्यांनी श्वेताला प्रचंड ट्रोल केलं होतं. 

ऐश्वर्या रायने नुकतचं 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये (Cannes Film Festival) हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्यासोबत अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) दिसून आला नाही. अभिषेक दरवर्षी कान्समध्ये जाऊन ऐश्वर्याला पाठिंबा देत असतो. पण यंदा मात्र त्याने हजेरी लावली नाही. पण आराध्या बच्चन मात्र आईला पाठिंबा देण्यासाठी तिच्यासोबत कान्सला गेली होती. 

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget