एक्स्प्लोर
शिक्षक दिनाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांच्या नावाची शिष्यवृत्ती
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना एका शिष्याने शिक्षक दिनी अनोखी मानवंदना दिली आहे. अमिताभ बच्चन यांच्या नावाने दरवर्षी शिक्षक दिनी एक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने बॉलिवूड निर्माता आनंद पंडित यांनी आपला गुरु असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सिनेमाच्या अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याला गौरवलं जाणार आहे.
यावर्षीची अमिताभ बच्चन यांच्या नावाची पहिली शिष्यवृत्ती सिनेदिग्दर्शक सुभाष घईंच्या व्हिसलिंग वूड्सच्या एका विद्यार्थ्याला देण्यात येईल. सिनेजगतात येऊ पाहणाऱ्या नव्या कलाकारांना संधी आणि प्रोत्साहन देण्यासाठी या शिष्यवृत्तीचा उपयोग होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement