Aishwarya Rai : 'आम्ही ऐश्वर्यासाठी.... 'अभिनेत्रीच्या वाढिदिवसानंतर अमिताभ यांचं 'ते' ट्विट व्हायरल
Aishwarya Rai : ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बच्चन कुटुंबातील कुणीही तिला शुभेच्छा दिल्या नाहीत. पण सध्या सोशल मीडियावर अमिताभ यांचं एक ट्विट व्हायरल होतंय.
Aishwarya Rai : मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडचा एक मोठा चेहरा असलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिने नुकताच तिचा 51वा वाढदिवस साजरा केला. पण तिच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबातील कुणीही सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या नसल्याचं पाहायला मिळालं. पण असं असलं तरीही काहीच दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या वाढदिवसाला ऐश्वर्याने शुभेच्छा दिल्या होत्या. या सगळ्यात पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झालीये.
ऐश्वर्याच्या वाढदिवासाला तिच्या लाखो चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्यात. मात्र बच्चन कुटुंबाची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. पण सध्या रेडिटवर अमिताभ बच्चन यांचं एक जुन ट्विट व्हायरल होत आहे. यामध्ये अमिताभ आणि संपूर्ण बच्चन कुटुंबाने ऐश्वर्याचा वाढदिवस आनंदात साजरा केला असल्याचं समजतंय.
अमिताभ यांचं कोणतं ट्विट व्हायरल होतंय?
अमिताभ यांचं 2010 मधलं एक ट्विट सध्या व्हायरल होतंय. त्यामध्ये एका ट्विटमध्ये अमिताभ यांनी म्हटलंय की, T172 -ऐश्वर्याला सगळ्यांनी तिच्या वाढदिवासाला खूप शुभेच्छा दिल्या, त्यासाठी मनापासून धन्यवाद..तिच्यापर्यंत सगळ्या शुभेच्छा पोहचवल्या आहेत आणि तिनेच सगळ्यांचे आभार मानलेत. एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये अमिताभ यांनी ऐश्वर्याच्या बर्थडेचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, ताजमध्ये फॅमिली डिनरचं आयोजन केलं होतं. त्या दिवसामुळे खरंच खूप छान वाटलं.
14 years ago, how time changes
byu/Far-Ladder-2209 inBollyBlindsNGossip
यंदा ऐश्वर्याला बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही शुभेच्छा नाहीत?
यंदाच्या वर्षात मात्र ऐश्वर्याला बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही शुभेच्छा मिळाल्या नसल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसलं. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण अद्यापही ऐश्वर्या आणि अभिषेकडून यावर अधिकृत असं भाष्य करण्यात आलेलं नाहीये.
View this post on Instagram