एक्स्प्लोर
बिग बींचा 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'मधील लूक व्हायरल
'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' सिनेमाच्या सेटचे याआधी फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र सिनेमातील कुठल्या पात्राचे फोटो आतापर्यंत समोर आले नव्हते.
मुंबई : 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' सिनेमातील एका पात्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमातील अद्याप कोणत्याच भूमिकेचा लूक समोर आला नव्हता किंवा सिनेमाची कथा काय आहे, हेही उघड करण्यात आलेली नाही. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' सिनेमातील असल्याचे म्हटले जात आहे.
महानायक अमिताभ बच्चन या सिनेमात एका वृद्धाच्या भूमिकेत असल्याचे या व्हायरल फोटोतून दिसत आहेत. चेहऱ्यावर सुरकुत्या, जाड काचांचा चष्मा, मळकट पगडी आणि डोक्यासह मानेभोवती कपडा, पांढरी दाढी अशा अवस्थेतील हा वृद्धा दुसरा तिसरा कुणी नसून, दस्तुरखुद्द महानायक अमिताभ बच्चन आहेत, हे पाहताक्षणी लक्षातही येत नाही.
'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' सिनेमाच्या सेटचे याआधी फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र सिनेमातील कुठल्या पात्राचे फोटो आतापर्यंत समोर आले नव्हते. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आमिर खान, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. विजय कृष्ण आचार्य हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून, पुढील वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement