एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'वादी-ए-कश्मीर'च्या निमित्ताने अमिताभ आणि हेमा मालिनी पुन्हा एकत्र
काश्मीरची प्रतिमा सुधारण्यासाठी केंट आर.ओ.ने पुढाकार घेतला असून, यासंदर्भात एक शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. यात काश्मीर बद्दल अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी देशवासियांना आवाहन करत आहेत.
नवी दिल्ली : काही दिवसांपासून धुमसत्या काश्मीरमुळे अनेक अफवाह पसरवल्या जात आहेत. पण काश्मीरची प्रतिमा सुधारण्यासाठी केंट आर.ओ.ने पुढाकार घेतला आहे.
कंपनीने 'वादी-ए-कश्मीर' नावाची एक शॉर्ट फिल्म बनवली असून, यात शोले सिनेमातील बहुचर्चित अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी ही जोडी एकत्रित दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांनीही या शॉर्ट फिल्मचा काही भाग ट्विट केला आहे.
केंट आर.ओने सामजिक बांधिलकी दाखवत काश्मीच्या निसर्ग सौंदर्याशी प्रेक्षकांना अंतर्मुख केलं आहे. ही शॉर्ट फिल्म पाहताना प्रेक्षकांना स्वर्ग सुखाचा अनुभूती मिळते. निसर्ग सौंदर्याची ही अनुभूत मिळवण्यासाठी काश्मीरला भेट देण्याचे आवाहन यामधून करण्यात आलं आहे. तसेच काश्मीरचा अपप्रचार थोपवताना, काश्मीच्या वैभवाविषयी यातून माहिती देण्यात आली आहे. शॉर्ट फिल्म पाहाVaadi-e-Kashmir -A msg of oneness & love to our sisters & brothers in Kashmir. #DilSeKashmirhttps://t.co/vqlMotjq0c pic.twitter.com/3Nq3hJFSfi
— Amitabh Bachchan FC (@Thekkapoor) September 5, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
निवडणूक
Advertisement