Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन कोकीलाबेन रुग्णालयात दाखल, मोठी अपडेट समोर
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे. आज सकाळी अमिताभ बच्चन यांनी माहिती दिली.
Amitabh Bachchan Latest News : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांना आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
81 वर्षीय अमिताभ बच्चन यांना आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रुग्णालया दाखल करण्यात आले. मात्र, अमिताभ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चर्चांना उधाण झाले होते. मात्र, त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.
T 4950 - in gratitude ever ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 15, 2024
अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत सगळ्यांचे आभार असे असे ट्वीट केले.
अमिताभ बच्चन सध्या ते त्यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात बिग बी एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. अमिताभ बच्चन शेवटचे टायगर श्रॉफसोबत गणपत चित्रपटात दिसले होते. मात्र, त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.