एक्स्प्लोर

विराटच्या समर्थनार्थ बिग बी पुन्हा मैदानात, ब्रॅड हॉजला टोला

मुंबई : दुखापतीमुळे आराम करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने धर्मशाला कसोटीत विश्रांती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर ब्रॅड हॉजने त्याला डिवचलं. मात्र कोहलीच्या समर्थनार्थ बिग बी पुन्हा मैदानात उतरले आहेत. ट्विटरवरुन दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हॉजचा समाचार घेतला आहे. 'ब्रॅड हॉज म्हणतो आयपीएल खेळण्यासाठी विराटने चौथ्या कसोटीतून माघार घेतली. काय मूर्खपणा आहे. खरं तर, तो नसतानाही त्याचा संघ तुम्हाला जोरदारा तडाखा देऊ शकतो, हे दाखवून देण्यासाठी विराट ही कसोटी खेळला नाही', असं ट्वीट करत बिग बींनी ऑस्ट्रेलियन संघालाच दणका दिला आहे. https://twitter.com/SrBachchan/status/846390197273030656 टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर बोचरी टीका करण्याचा ऑस्ट्रेलियन मंडळींचा शौक अजूनही पूर्ण होताना दिसत नाही. विराटवर तोंडसुख घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन मंडळींच्या यादीत ब्रॅड हॉजच्या नावाची भर पडली होती.

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराटने विश्रांती घेतली : ब्रॅड हॉज

विराटला तिसऱ्या कसोटीत झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे धर्मशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. भारतीय कर्णधाराने आयपीएलमध्ये खेळता यावं म्हणून चौथ्या कसोटीतून विश्रांती घेतली आहे, असा आरोप हॉजने केला होता. आयपीएलच्या बंगळुरु आणि हैदराबाद संघांमधल्या सलामीच्या आयपीएल सामन्यात विराट खेळला तर ते खूप वाईट असेल, असं भाष्यही त्यानं केलं. ब्रॅड हॉज हा आयपीएलमधल्या गुजरात लायन्स संघाचा प्रशिक्षकही आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये बंगळुरुचा कर्णधार असलेल्या विराटवर टीका करुन तो आपला दुहेरी हेतू साध्य करतो आहे का, असा प्रश्न भारतीय क्रिकेट रसिकांना पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला पुण्यातून सुरुवात झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर ऑस्ट्रेलियन मंडळींकडून टीकेचं सत्र सुरु झालं आहे. बंगळुरु कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि विराटमध्ये डीआरएसवरुन बिनसलं होतं. अमिताभ बच्चन याचं मागील ट्वीट कोहलीच्या समर्थनार्थ अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे की, “ऑस्ट्रेलियन मीडिया विराटला क्रीडाविश्वातील डोनाल्ड ट्रम्प बोलत आहे. त्याला विजेता आणि प्रेसिडेंट मानण्यासाठी आभार! क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षांचाही विराटला टोमणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनी विराट कोहलीवर निशाणा साधला होता. कोहलीला सॉरी म्हणता येत नाही, एवढचं नव्हे तर त्याला सॉरीची स्पेलिंगही माहित नसेल, असं वक्तव्य सदरलँड यांनी एका रेडिओ स्टेशनशी बोलताना केलं. धर्मशाळा इथे होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन मीडिया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हात धुवून मागे लागल्याचं चित्र आहे. यामध्ये आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनीही उडी घेतली. बंगळुरु कसोटीत विराटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर डीआरएसप्रकरणी जाहीर टीका केली होती. त्यानंतर विराटने स्मिथची माफी मागावी, अशी मागणी सदरलँड यांनी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी या मुद्द्यावरुन विराटवर निशाणा साधला. ऑस्ट्रेलियन मीडियाचा विराटवर निशाणा ऑस्ट्रेलियन मीडियाकडून सतत विराटला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने विराटची तुलना नुकतीच ‘क्रीडा जगतातील ट्रम्प’ अशी केली होती. त्यानंतर विराटच्या समर्थनार्थ बिग बी अमिताभ बच्चन आणि सुनील गावसकरही मैदानात उतरले होते. ऑस्ट्रेलियन मीडिया हा ऑस्ट्रेलिया संघाचा सपोर्टिंग स्टाफ आहे, असं सुनील गावसकर म्हणाले होते. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ऑस्ट्रेलियन मीडियाला प्रत्युत्तर दिलं होतं. ऑस्ट्रेलियन मीडियाने विराटला खेळातील ट्रम्प म्हटलं आहे. त्याबद्दल आभार, विराट विजेता आहे आणि राष्ट्रपतीही, हे ऑस्ट्रेलियाने स्वीकारलं आहे, असं खणखणीत उत्तर बिग बींनी दिलं होतं. काय आहे डीआरएस वाद? बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ पायचीत असल्याचं अपील पंचांनी उचलून धरलं, त्या वेळी स्मिथने डीआरएसचा कौल मागण्यासाठी ड्रेसिंग रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांकडे सहाय्याची अपेक्षा केली होती. भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याविरोधात पंचाकंडे तक्रार केली. त्यामुळे उभय कर्णधारांमध्ये वादाची ठिणगी पडली. बंगळुरू कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने स्मिथच्या त्या कृतीवर जाहीर टीका केली. संबंधित बातम्या :

विराटला ‘सॉरी’ची स्पेलिंगही येत नसेल : जेम्स सदरलँड

कर्णधार स्मिथचा खोटेपणा, डीआरएससाठी ड्रेसिंग रुमकडे इशारा!

डीआरएस वाद , बीसीसीआय-क्रिकेट ऑस्ट्रेलियात वादाची ठिणगी

ऑस्ट्रेलियन मीडियाकडून विराट कोहलीची डोनाल्ड ट्रम्प यांच्यांशी तुलना

कोहली वि. ऑस्ट्रेलियन मीडिया : विराटच्या समर्थनार्थ बिग बी मैदानात

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget