एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : आर्ची आणि परशाचं 'कास्टिंग काऊच' होणार!
मुंबई : पहिली मराठी वेबसीरिज 'कास्टिंग काऊच'मध्ये महाराष्ट्रच नाही तर देशाला याड लावणारे 'सैराट'चे आर्ची आणि परशा पाहायला मिळणार आहेत. अभिनेता अमेय वाघ आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्या या वेबसीरिजच्या चौथ्या एपिसोडचा टीझर रिलीज झाला आहे. 'सैराट'चा दिग्दर्शक नागराज मंजुळेनेही त्याच्या फेसबुक अकाऊंटवर हा टीझर पोस्ट केला आहे.
'कास्टिंग काऊच'च्या या एपिसोडमध्ये आज आर्ची अर्थात रिंकू राजगुरु आणि परशा म्हणजेच आकाश ठोसर पाहायला मिळतील. 'कास्टिंग काऊच'चा टीझर अमेय आणि निपुणच्या 'भारतीय डिजिटल पार्टी' या यू ट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे.
मालिकेचं नाव 'कास्टिंग काऊच' का?
मराठीतील पहिली वेबमालिका असलेल्या 'कास्टिंग काऊच'चे आतापर्यंत तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. एकाच 'काउच'वर बसून अभिनेता/अभिनेत्रींशी हलकाफुलका संवाद साधत हे दोघे धमाल उडवतात. सिनेमासाठी अभिनेत्रीला कास्ट करण्याच्या धडपडीमुळे या मालिकेला 'कास्टिंग काऊच' नाव देण्यात आलं आहे.
'कास्टिंग काऊच'च्या पहिल्या एपिसोडमध्ये राधिका आपटे, दुसऱ्या एपिसोडमध्ये श्रिया पिळगांवकर, तिसऱ्या भागात 'दिल दोस्ती दुनियादारी'तील सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर दिसल्या होत्या. 'सैराट'च्या टीमला 'कास्टिंग काऊच'मध्ये बोलावण्यासाठी निपुण आणि अमेय नागराज मंजुळेंच्या घरी दाखल झाले आहेत. त्यामुळे आता आर्ची-परशासोबत होणाऱ्या 'कास्टिंग काऊच'चा एपिसोची उत्सुकता लागली आहे.
कास्टिंग काऊच म्हणजे काय?
'कास्टिंग काऊच' हा शब्द सिनेसृष्टीत प्रचलित आहे. खरंतर याबद्दल भारतात आजही उघडपणे बोललं जात आहे. चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी आलेल्या अनेकांना कास्टिंग काऊच्या वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं. अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांनाकडे ऑडिशनवेळी बऱ्याचदा लैंगिक सुखाची मागणी केली जाते. काही कलाकारांनी याबाबत वाच्यता केली आहे.
मात्र अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांच्या कास्टिंग काऊच या वेबसीरिजची कन्सेप्ट वेगळी आहे. कलाकार आणि हे दोघे एकाच काऊचवर बसून हलक्याफुलक्या गप्पा मारतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement