एक्स्प्लोर

Alka Yagnik : अलका याग्निक यांना अचानक ऐकू येणं बंद; तुम्हीही हेडफोन लावून गाणी ऐकत असाल, तर या दुर्मिळ आजाराबद्दल जाणून घ्या

Rare Sensory Hearing Loss : गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजार झाला असून त्यांना दोन्ही कानांनी ऐकू येणं अचानक बंद झालं.

मुंबई : प्रसिद्ध गायिका अलका याग्निक (Alka Yagnik) यांना दुर्मिळ आजाराची लागण झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे.  अलका याग्निक यांनी बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यांची गाणी रसिकांना मंत्रमुग्ध करतात. गायकाच्या सुरेल आवाजाने जगाला वेडं लावलं. त्यांना दुर्मिळ आजाराची लागण झाल्याची बातमी ऐकताच चाहते चिंतित झाले आहेत. 

अलका याग्निक यांना अचानक ऐकू येणं बंद 

अलका याग्निक या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. यासोबतच अलका याग्निक यांनी आजारपणाची व्यथाही पोस्टमध्ये चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हा आजार नेमका कोणता आहे, याची कारणं लक्षणे आणि उपाय जाणून घ्या. 

दुर्मिळ आजारामुळे ऐकण्याची क्षमता गमावली

अलका याग्निक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून तिच्या तब्येतीची माहिती दिली आहे. तिने सांगितले की तिला दुर्मिळ शारीरिक समस्या आहे, ज्यामुळे तिच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याला व्हायरल अटॅकमुळे हा त्रास झाला आहे. त्याने त्याच्या चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

अलका याग्निक नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट गायिका

अलका याग्निक एक प्रसिद्ध भारतीय गायिका आहे. त्या नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक आहे. त्यांचे संगीताशी असलेले नाते अनेक दशकांपूर्वीचे आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांचा आवाज लोकांचं मनोरंजन करत आहे. या काळात त्यांनी 'तू शायर है मैं तेरी शायरी', 'गली में आज चांद निकला', 'अगर तुम साथ हो' अशा अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

अलका याग्निक यांना कोणता दुर्मिळ आजार आहे?

गायिका अलका याग्निक यांना रेअर सेंसरिनुरल नर्व्ह हिअरिंग लॉस (Sensorineural Nerve Hearing Loss) हा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारामध्ये कानापासून मेंदूपर्यंत जाणारी नस डॅमेज होते.

अचानक ऐकू येणं बंद होण्यामागची कारणे काय?

हा आजार होण्याची अनेक कारणे आहेत.

  • वाढत्या वयोमानानुसार नस डॅमेज होतात.
  • काही वेळेस व्हायरल इंन्फेक्शनमुळे मेनिन्जायटिस (मेंदूवरील आवरणाला सूज आणणारा आजार), गोवर आणि मेनिएर रोग यांसारख्या रोगांनंतर नसांचे नुकसान होते.
  • डोक्याला किंवा कानाला दुखापत झाल्यामुळेही नसांचे नुकसान होते.
  • कानाच्या आतील पेशींना इजा पोहोचवणाऱ्या काही औषधांमुळे नसा डॅमेज होऊन बहिरेपणा येतो.
  • बराच वेळ मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने बहिरेपणा येऊ शकतो.

या आजारावर उपाय काय?

दरम्यान, व्हायर इंन्फेक्शनमुळे बहिरेपणा आला असेल तर, हळूहळू रुग्ण बरा होताना, त्याला ऐकू येऊ लागते. पण, हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. मात्र, उपचारांमुळे काही प्रमाणात ऐकण्याची क्षमता परत आणता येऊ शकते. यामध्ये, औषधे, कॉक्लियर इम्प्लांट आणि श्रवणयंत्र यांचा समावेश आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana Lonar Lake Update : लोणार सरोवराचं नुकसान होत असल्याच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, भूस्खलन होत असलेल्या भागाची पाहणी होणारNDA Meeting Update : एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी जाण्याची शक्यता कमी, अजित पवार मुंबईत असल्याची सूत्रांची माहितीABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : लाडक्या बहिणींचे १५०० देण्यासाठी भाऊ आणि नवऱ्यांना सरकार दारुडे करणार, राऊतांची सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत
आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी.. कष्टाचे पैसे द्या, योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी
Embed widget