Alia Bhatt : आलिया भट्टने तीन महिन्यात 16 किलो वजन कसं कमी केलं? जाणून घ्या अभिनेत्रीचा डाएट प्लॅन...
Alia Bhatt Weight Loss Diet Plan : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 16 किलो वजन कमी केलं आहे.
![Alia Bhatt : आलिया भट्टने तीन महिन्यात 16 किलो वजन कसं कमी केलं? जाणून घ्या अभिनेत्रीचा डाएट प्लॅन... Alia Bhatt Weight Loss Diet Plan How did Alia Bhatt lose 16 kg in three months Know the diet plan of the bollywood actress Alia Bhatt : आलिया भट्टने तीन महिन्यात 16 किलो वजन कसं कमी केलं? जाणून घ्या अभिनेत्रीचा डाएट प्लॅन...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/12/c7260d21b41422b2d92314f80fd564811689137017216254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Alia Bhatt Weight Loss Diet Plan : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' (Student Of The Year) या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. पण सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी आलियाचं वजन 67 किलो होतं. फक्त तीन महिन्यात तिने 16 किलो वजन कमी केलं आहे.
वजन कमी करण्यासाठी आलिया भट्टने नियमितपणे जिममध्ये व्यायाम आणि योगा करण्यावर भर दिला होता. अनेकदा सोशल मीडियावर ती वर्तआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आलिया दररोज ट्रेडमिलवर न चुकता 10 मिनिटे चालते. तसेच पुशअप्स, डंबेल आणि योगाही ती करते.
आलिया भट्टचा डाएट प्लॅन काय आहे? (Alia Bhatt Diet Plan)
- आलियाच्या नाश्त्यामध्ये ब्रेड टोस्ट, कॉनफ्लॅक्स, पोहे, अंड, सँडविच आणि चहा-कॉफी यापदार्थांचा समावेश असतो.
- नाश्ता आणि जेवणाच्यामध्ये आलिया एक ग्लास भाज्यांचा सर आणि फळे किंवा वडा-सांबार, इडली, डोसा अशा दाक्षिणात्य पदार्थांचं सेवन करते.
- दुपारच्या जेवणात आलिया डाळ, चपाती किंवा भाकरी आणि तेलकट नसलेल्या भाज्या खाते.
- संध्याकाळी आलिया फळे आणि साखर नसलेला चहा किंवा कॉफी पिते.
- रात्रीच्या जेवणात आलिया चिकन किंवा भाजी आणि डाळ-भात खाते.
आलियाचा आठवड्याभराचा वर्कआऊट प्लॅन जाणून घ्या.. (Alia Bhatt Weight Loss Plan)
पहिला दिवस :
- वॉर्म अप - 5 मिनिटे
- ट्रेडमिलवर चालणे - 10 मिनिटे
- पुश अप्स - 30
- डंबेल - 3 सेट
- बायसेप कर्ल - 3 सेट
दुसरा दिवस :
- वॉर्म अप - 5 मिनिटे
- योगा
तिसरा दिवस :
- वॉर्म अप - 5 मिनिटे
- अब क्रंच्स - 3 सेट
- सायकर क्रंच्स - 3 सेट
- रिव्हर्स क्रंच्स - 3 सेट
चौथा दिवस :
- आराम
पाचवा दिवस :
- वॉर्म अप - 5 मिनिटे
- ट्रेडमिलवर चालणे - 10 मिनिटे
- पुश अप्स - 30
- डंबेल - 3 सेट
- बायसेप कर्ल - 3 सेट
सहावा दिवस :
- वार्म अप - 5 मिनिटे
- योगा
सातवा दिवस :
- आराम
आलिया भट्टचा सिनेप्रवास (Alia Bhatt Movies)
आलियाने 'हाईवे', 'हल्टी शर्मा की दुल्हनिया', 'शानदार', 'कपूर्स अॅण्ड सन्स', 'उडता पंजाब', 'ए दिल है मुश्किल', 'डिअर जिंदगी', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'ब्रह्मास्त्र', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे. आलियाचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Or Rani Ki Prem Kahani) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
संबंधित बातम्या
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर आऊट; आलिया-रणवीरच्या सिझलिंग केमिस्ट्रीने जिंकली प्रेक्षकांचं मन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)