La Ilaaj : आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, विजय वर्मासोबतच्या केमिस्ट्रीला मिळतेय प्रेक्षकांची पसंती!
Darlings Song : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग्स' (Darlings) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.
Darlings Song : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग्स' (Darlings) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. आलिया सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. आलियाचा हा चित्रपट 5 ऑगस्ट 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्याआधी आज 'डार्लिंग्स' चित्रपटातील 'ला इलाज' (La Ilaaj) हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे रिलीज होताच त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘ला इलाज’ हे गाणे खूप पसंत केले जात आहे. हे गाणे अरिजित सिंहने गायले असून, गीतकार गुलजार यांनी लिहिले आहे.
आलिया भट्टने साकारलेल्या आयुष्याचा प्रवास ‘ला इलाज’ या गाण्यात दाखवण्यात आला आहे. या स्लो रोमँटिक गाण्यात आलिया भट्ट आणि अभिनेता विजय वर्मा यांची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळते. गाण्यात चित्रपटातील फक्त दृश्यांचा समावेश करण्यात आला आहे. आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर हे गाणे शेअर केले आहे.
पाहा गाणे :
‘ला इलाज’ या गाण्यातील आलिया आणि विजयचा रोमान्स प्रेक्षकांची या चित्रपटासाठी उत्सुकता आणखी वाढवत आहे. या गाण्याचे बोल खूप चांगले आहेत. या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत 3 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावरही या गाण्याला चाहत्यांचे भरपूर प्रेम मिळत आहे.
आलियाने सांभाळली निर्मितीची धुरा
आलिया भट्टने अभिनयासोबतच निर्मितीची धुरा सांभाळली आहे. आलियाचे प्रोडक्शन हाऊस आणि शाहरुखचे प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक जसमीत के रेन यांचा हा डेब्यू प्रोजेक्ट आहे. हा चित्रपट 5 ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय वर्माने आलिया भट्टच्या पतीची भूमिका साकारली आहे.
काय आहे कथानक?
ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या दोन महिलांची कथा विनोदी आशयाने मांडण्यात आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात शेफाली शाहने आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारली आहे आणि विजय वर्मा तिच्या पतीच्या भूमिकेत आहे. या कलाकारांना एका कॉमेडी चित्रपटामध्ये पाहणे हे प्रेक्षकांसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नसेल. आलिया आणि शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटने हा चित्रपट संयुक्तपणे तयार केला आहे. जसमीत के रीन यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा: