Akshaya Hardeek Wedding : राणादा-पाठकबाईंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा; व्हिडीओ व्हायरल
Akshaya Hardeek Wedding : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील राणादा-पाठकबाईंना व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
Akshaya Hardeek Wedding : अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) ही महाराष्ट्राची लाडकी जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या लाडक्या जोडीला व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षया-हार्दिकच्या शाही विवाहसोहळ्यानंतर खास रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळच्या मित्र-मैत्रीणी आणि नातेवाईंकांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. राजकीय मंडळीदेखील त्यांच्या रिसेप्शनला उपस्थित होते.
View this post on Instagram
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील त्यांच्या लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. पण काही कारणाने त्यांना लग्नाला उपस्थित राहयला जमलं नाही. त्यामुळे त्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉलवर शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडीओ कॉलवर मुख्यमंत्री शुभेच्छा देत म्हणत आहेत,"मला लग्नाला यायला जमलं नाही म्हणून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यावर हार्दिक म्हणाला,"ठाण्यात आलो की भेटायला येतो". शुभेच्छांनंतर दोघांनीही मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
अक्षया-हार्दिकचा शाही विवाहसोहळा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. मालिकेनंतर अचानक साखरपुडा करत दोघांनीही चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. खऱ्या आयुष्यात राणादा आणि पाठकबाई एकमेकांचे जोडीदार झाल्याने चाहते मात्र आनंदीत झाले आहेत. सध्या त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.