Akshaya Hardeek Wedding : "मला माझ्या लग्नात नऊवारी, खोपा, दागिने..."; लग्नानंतर पाठकबाईंची पोस्ट चर्चेत
Akshaya Hardeek Wedding : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले आहेत.
![Akshaya Hardeek Wedding : Akshaya Deodhar Hardeek joshi Wedding After the wedding Akshaya has written a special post sharing the wedding photos with his fans Akshaya Hardeek Wedding :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/25d46f9f6b9e385a5231647dcd562ee31670123999865254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Akshaya Hardeek Wedding : अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले आहेत. पुण्यात पारंपरीक पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नात दोघांनीही पारंपरीक लूक करत सर्वांचं लक्ष वेधलं.
लग्नानंतर अक्षयाने लग्नसोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. अक्षयाने लिहिलं आहे,"मला माझ्या लग्नात अगदी पारंपरिक लूक करायचा होता. नऊवारी, खोपा, पारंपारिक दागिणे सर्व काही पारंपरिक... कारण मला आवडतं".
याआधीदेखील अक्षया आणि हार्दिकने लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले होते. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं होतं,"आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळालं आहे. तुम्ही तयार केलेल्या सकारात्मक वातावरणामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. नव्या आयुष्याची सुरुवात करताना आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. लवकरच लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुमच्यासोबत शेअक करू".
View this post on Instagram
लाल रंगाची नऊवारी साडी, गळ्यात ठुशी, काळ्या मण्यांनी भरलेलं मंगळसुत्र, हिरव्या बांगड्या, मोत्याची नथ असा अक्षयाचा लग्नातला लूक होता. तर दुसरीकडे हार्दिकने लाल रंगाचं धोतर आणि क्रिम रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तसेच त्यांच्या मुंडावळ्यादेखील आकर्षक होत्या. त्यांचा लग्नसोहळ्यातील लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
हार्दिक आणि अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेत हार्दिकने राणादा ही भूमिका तर अक्षयाने पाठकबाईंची भूमिका साकारली होती. दोघांच्याही भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.
संबंधित बातम्या
Akshaya Hardeek Wedding : राणादा आणि पाठक बाईंचा जीव एकमेकांत गुंतला, सप्तपदी घेत सुखी संसाराची सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)