(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akshay Kumar : हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचे चित्रपट एकापाठोपाठ फ्लॉप होत आहेत. अक्षय कुमार आणि त्याचे चाहते एका हिट चित्रपटासाठी आसुसलेले असताना एक चांगली बातमी समोर आली आहे.
Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे चित्रपट एकापाठोपाठ फ्लॉप होत आहेत. अक्षय कुमार आणि त्याचे चाहते एका हिट चित्रपटासाठी आसुसलेले आहेत. आता अक्षय कुमारचा आणखी एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून प्रेक्षकांना या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत. येत्या 12 जुलै रोजी अक्षय कुमारचा 'सरफिरा' (Sarfira Movie) हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या हिट चित्रपटांचा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
अक्षय कुमारच्या 'सरफिरा' या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे अक्षयचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनेही मोठा विक्रम रचला आहे.
'सरफिरा'ने रचला इतिहास
अक्षय कुमारच्या 'सरफिरा' या चित्रपटाचा ट्रेलर 18 जून रोजी लाँच करण्यात आला होता. ट्रेलर रिलीज होऊन 13 दिवस उलटले आहेत. अल्पावधीतच 'सरफिरा'चा ट्रेलर 2024 मधील हिंदी चित्रपटांचा सर्वाधिक पाहिला जाणारा ट्रेलर बनला आहे. या बाबतीत अक्षय कुमारच्या चित्रपटाने शाहिद कपूरच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या ट्रेलरचा विक्रम मोडला आहे.
'सरफिरा'ला आतापर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत
अक्षय कुमारच्या 'सरफिरा'च्या ट्रेलरला आतापर्यंत 6 कोटी 83 लाख 37 हजार 228 (68,337,288) व्ह्यूज मिळाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, आतापर्यंत 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरला 59 दशलक्ष म्हणजेच 5 कोटी 90 लाख व्ह्यूज मिळाले होते. 'सरफिरा'ने हा विक्रम मोडला आहे.
चित्रपट हिट ठरणार?
View this post on Instagram
अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही कमाल करेल असा विश्वास आहे. ट्रेलर रेकॉर्ड ब्रेकर असल्याने हा चित्रपट हिट ठरू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय परेश रावल आणि राधिका मदान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा प्रसाद यांनी केले आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे.
फ्लॉप झाला होता 'बडे मियाँ छोटे मियाँ'
मागील काही काळापासून अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप ठरत आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपटही फ्लॉप ठरला. या चित्रपटात टायगर श्रॉफचीदेखील भूमिका होती. या चित्रपटाने वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर 111 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे बजेट 350 कोटी रुपये होते.