Akshay Kumar : तर पहिल्यांदा भारत वाचवण्यासाठी येणार, अमेरिका नाही! खिलाडी कुमारने सरकारला केली विनंती!
Akshay Kumar : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) यांचा 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chote Miyan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान "तर पहिल्यांदा भारताला वाचवण्यासाठी येणार, अमेरिकेला नाही", असं वक्तव्य खिलाडी कुमारने केलं आहे.
![Akshay Kumar : तर पहिल्यांदा भारत वाचवण्यासाठी येणार, अमेरिका नाही! खिलाडी कुमारने सरकारला केली विनंती! Akshay Kumar Says Whatever Happens we Want India to Save not America Promote Tiger Shroff Bade Miyan Chote Miyan Movie Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Akshay Kumar : तर पहिल्यांदा भारत वाचवण्यासाठी येणार, अमेरिका नाही! खिलाडी कुमारने सरकारला केली विनंती!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/581138c154b9c7a3db061aefedce0dcb1710574222264254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Akshay Kumar : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) यांचा 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chote Miyan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान "तर पहिल्यांदा भारताला वाचवण्यासाठी येणार, अमेरिकेला नाही", असं वक्तव्य खिलाडी कुमारने केलं आहे.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियां छोटे मियां' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दोघेही पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. दोघांचाही अॅक्शन मोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशातच अक्षय म्हणाला,"कुठेही काही अडचणी निर्माण होतात तेव्हा आपल्या मदतीला अमिरेका धावून येते. पण आता पहिल्यांदाच भारत वाचवण्यासाठी येणार आहे. अमेरिका नाही"
अक्षयने 'बडे मियां छोटे मियां' का निवडला?
अक्षय म्हणाला की,"बडे मियां छोटे मियां' या मालिकेचं कथानक वाचलं तेव्हा या सिनेमातील अॅक्शन आणि विनोद मला सर्वात आधी भावला. दोन्ही गोष्टी मला खूप आवडतात. त्यामुळे काहीही विचार न करता मी आपला होकार कळवला होता. या सिनेमाचं कथानक खूपच मजेदार आहे. खूप दिवसांनी मला टायगरसोबत अॅक्शन करायला मिळणार याचा आनंद होता".
टायगरने 'बडे मियां छोटे मियां'ची निवड का केली?
टायगर म्हणाला,"आपल्या खरा अॅक्शन हिरो टॉम क्रूझ (अक्षय कुमार) सोबत काम करायला मिळणार असल्याचा आनंद आहे. त्यामुळे या सिनेमासाठी माझी विचारणा केली त्याबद्दल सर्वात आधी निर्मात्यांचे आभार. या सिनेमाने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अक्षय सरांनी मला व्यायामाची सवय लावली".
स्वत:चं केले सर्व स्टंट्स
अक्षयने 'बडे मिया छोटे मियां' या सिनेमातील आपले स्टंट स्वत:च केले आहेत. तसेच खूप कमी वीएफएक्स स्टंटचा अवलंब केला आहे. अबु धाबी, जोर्डन, स्कॉटलँड, ग्लासगो आणि यूके या देशांमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. व्यावसायिक पातळीवर टायगरकडून मला अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत. प्रत्येक स्टटंआधी अक्षय वॉर्म अप, स्ट्रेडिंग करत असे.
'बडे मिया छोटे मियां' कधी रिलीज होणार? (Bade Miyan Chote Miyan Release Date)
'बडे मिया छोटे मियां' हा सिनेमा 10 एप्रिल 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अक्षय आणि टायगर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. अक्षय आणि टायगरसह 'बडे मिया छोटे मियां' या सिनेमात सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
संबंधित बातम्या
Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये खिलाडी कुमारचा धमाकेदार फरफॉर्मन्स, पण त्यासाठी अक्षयला मोडावा लागला त्याचा फार जुना नियम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)