एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
अक्षय कुमार सर्वात कठीण मेहनत करणारा अभिनेता : सलमान खान
![अक्षय कुमार सर्वात कठीण मेहनत करणारा अभिनेता : सलमान खान Akshay Kumar Is One Of The Most Amazing And Talented Actor Says Salman Khan अक्षय कुमार सर्वात कठीण मेहनत करणारा अभिनेता : सलमान खान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/21183514/akshay-salman.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'रोबो 2' म्हणजे 2.0 चा फर्स्ट लूक लाँचिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यात अभिनेता सलमान खानने अक्षय कुमारच्या कामाच्या शैलीचं तोंडभरुन कौतुक केलं.
''आम्हा कलाकारांपैकी कुणी पुढे गेलं असेल तर तो फक्त अक्षय कुमार आहे. त्याच्यामधील काम करण्याची क्षमता दाद देण्यासारखी आहे. सर्वात कठीण मेहनत करणाऱ्या अभिनेत्यांपैकी अक्षय एक आहे'', असं सलमान म्हणाला.
'रोबो 2' चा फर्स्ट लूक काल मुंबईत यशराज स्टुडिओमध्ये लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला सिनेमाचे दिग्दर्शक एस. शंकर, रजनीकांत, अक्षय कुमार आणि करण जोहर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.
सलमान कार्यक्रमासाठी येईल, अशी कोणाला कल्पनाही नव्हती. मात्र आपण अचानक का आलो, याचा खुलासाही सलमानने केला. रजनीकांत यांना पाहण्यासाठी आपण इथे आलो, असं सलमान म्हणाला.
![अक्षय कुमार सर्वात कठीण मेहनत करणारा अभिनेता : सलमान खान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/21183531/salman-rajnikant-akshay.jpg)
संबंधित बातमी : 'रोबो 2'चं पहिलं पोस्टर रिलीज, अक्षय कुमारचा अफलातून लूक
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion