Prashant Damle Meet Sharad Pawar: मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामलेंनी घेतली शरद पवार यांची भेट
प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे.
Prashant Damle Meet Sharad Pawar: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नुकतीच शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या ट्विटर अकाऊंटवर प्रशांत दामले आणि शरद पवार यांच्या भेटीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.
प्रशांत दामले आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांनी आज मुंबईतील यशवंराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी तिथे आमदार रोहित पवार आणि कोषाध्यक्ष हेमंत टकले हे देखील उपस्थित होते. शरद पवार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, ज्येष्ठ कलाकार श्री. प्रशांत दामले आणि परिषदेच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांनी आज मुंबईतील यशवंराव चव्हाण सेंटर येथे सदिच्छा भेट घेतली. सर्व सदस्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या वेळी कोषाध्यक्ष हेमंत टकले, आमदार रोहित पवार उपस्थित होते.'
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, ज्येष्ठ कलाकार श्री. प्रशांत दामले व परिषदेच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांनी आज मुंबईतील यशवंराव चव्हाण सेंटर येथे सदिच्छा भेट घेतली. सर्व सदस्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या वेळी कोषाध्यक्ष हेमंत… pic.twitter.com/lbm6nIPW27
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 17, 2023
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीदेखील भेट घेतली आहे. यावेळी अजित भुरे यांच्यासह नव्या कार्यकारिणीचे सदस्यदेखील उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दामले यांचं अभिनंदन केलं. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर प्रशांत दामले म्हणाले होते,"आताचं सरकार हे ऐकणारे सरकार आहे".
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संजय देसाई, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश आहे.
कोणाला कोणते पद?
अध्यक्ष- प्रशांत दामले
सहकार्यवाह- समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुनील ढगे
उपाध्यक्ष - नरेश गडेकर
उपाध्यक्ष उपक्रम- भाऊसाहेब भोईर
खजिनदार- सतीश लोटके
संबंधित बातम्या