एक्स्प्लोर
आकाश अंबानींची प्री-एंगेजमेंट सेरेमनी; शाहरूखसह दिग्गजांची हजेरी
आकाश अंबानी याची श्लोका मेहताशी काही दिवसांत एंगेजमेंट होत आहे. त्याअगोदर झालेल्या या सोहळ्यात शाहरूख खानने पत्नी गौरी खानसह अंबानी कुटुंबियाच्या या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर रणबीर कपूर, अयान मुखर्जी, आलिया भट्ट, करण जोहर हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुंबई : उद्योगपती मुंकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीची आज प्री-एंगेजमेंट सेरेमनी मुंबईमध्ये ठेवण्यात आली. या सोहळ्याला अनेक मोठ्या सेलेब्रेटींनी हजेरी लावली. यामध्ये बॉलिवूड स्टार्स पासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचाही समावेश होता.
आकाश अंबानी याची श्लोका मेहताशी काही दिवसांत एंगेजमेंट होत आहे. त्याअगोदर झालेल्या या सोहळ्यात शाहरूख खानने पत्नी गौरी खानसह अंबानी कुटुंबियाच्या या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर रणबीर कपूर, अयान मुखर्जी, आलिया भट्ट, करण जोहर हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आकाश हा मुकेश अंबानींचा सर्वात मोठा मुलगा आहे. आकाशची एंगेजमेंट ज्या श्लोका मेहतासोबत होत आहे ती हिरा व्यापारी रसेल मेहता यांची कन्या आहे. श्लोकाने अमेरिकेतील प्रिंसटन विद्यापीठातून मानवशास्त्राची पदवी घेतली आहे. त्याचबरोबर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मास्टर्स डिग्रीही मिळवली आहे. आकाश आणि श्लोकाची लहानपणापासूनच मैत्री आहे.
या प्री- एंगेजमेंट पार्टीमध्ये आकाश आपली होणारी पत्नी श्लोकाला घ्यायला आपल्या परिवारासह पोहोचला. यावेळी मुकेश अंबानी आणि बहीण इशा अंबानीही आकाशसोबत दिसले.
शाहरूख पत्नी गौरीसह कार्यक्रमाला उपस्थित होता.
यावेळी लव्ह बर्ड रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी मात्र कार्यक्रमाला सोबत येण्याचं टाळलेलं दिसलं.
यासोबतच निर्माता दिग्दर्शक करण जौहर आणि मास्टर ब्लास्टर सचिनचीही उपस्थिती पाहायला मिळाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement