Salman Khan Actress : सलमान खानसोबत झळकली, 20 वर्ष इंडस्ट्रीपासून होती दूर, ही अभिनेत्री आता करतेय कमबॅक, रणबीरसोबत आहे नातं
Salman Khan Actress : ही स्टारकिड इंडस्ट्रीत फार काळ टिकू शकली नाही. या अभिनेत्रीने चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. आता ही अभिनेत्री 20 वर्षानंतर इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे.
Salman Khan Actress: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) अनेक अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. यातील अनेक अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीत स्थिरस्थावर झाल्या आहेत. तर, काहींना आपली छाप सोडण्यास अपयश आले. सलमानच्या डॅशिंग रोलसोबत विनोदी भूमिकांनादेखील प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. 2004 मध्ये सलमानचा ॲक्शन ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने पोलिसाची भूमिका केली होती. चित्रपटात सलमानसोबत आणखी एक स्टारकिड दिसली. ही स्टारकिड इंडस्ट्रीत फार काळ टिकू शकली नाही. या अभिनेत्रीने चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर तिने सिनेइंडस्ट्रीपासून दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला. आता ही अभिनेत्री 20 वर्षानंतर इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे.
सलमान खानच्या 'गर्व' या चित्रपटात त्याच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आकांक्षा मल्होत्रा (Akanksha Malhotra) आता सिनेइंडस्ट्रीत कमबॅक करत आहे. आकांक्षा ही यशस्वी व्यावसायिक आहे. आकांक्षा ही सिनेइंडस्ट्रीपासून दोन हात लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय आहे.
View this post on Instagram
कोण आहे आकांक्षा मल्होत्रा?
आकांक्षा मल्होत्रा ही अभिनेता-निर्माता प्रेम किशन मल्होत्रा यांची मुलगी आहे. प्रेमनाथ मल्होत्रा आणि बीना रॉय हे तिचे आजोबा-आजी होते. आकांक्षाने तेलगू चित्रपट चिन्नामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ये मोहब्बत है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर आकांक्षा एलओसी, गर्व, ऐसा क्यो होता है आदी चित्रपटात काम केले. मात्र, आकांक्षाला आपली वेगळी छाप सोडता आली नाही.
20 वर्षानंतर आता करणार कमबॅक
गर्वच्या 20 वर्षानंतर आता आकांक्षा मल्होत्रा ही कमबॅक करत आहे. आकांक्षा ही वेब सीरिज 'अनरिअल'च्या माध्यमातून कमबॅक करत आहे. ही वेब सीरिज अजून रिलीज झाली नाही. वेब सीरिजचे चित्रीकरण सुरू असून सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली.
View this post on Instagram
रणबीर कपूरशी आहे संबंध
आकांक्षा मल्होत्रा रणबीर कपूरशी नाते आहे. आकांक्षाचे आजोबा प्रेमनाथ मल्होत्रा हे राज कपूर यांचे मेहुणे होते. आकांक्षा ही राज कपूर, राजेंद्र नाथ आणि नरेंद्र नाथ यांची नात आहे. ती ऋषी कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर आणि मॉन्टी नाथ यांची भाची आणि रणबीर कपूर, करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांची चुलत बहीण आहे.