Ajith Accident : कार उलटली, एअरबॅग उघडल्या, अपघातात सुपरस्टार अजित थोडक्यात बचावला; पाहा व्हिडीओ
Ajith Accident Video: सुपस्टार अजित यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अजित यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.

Ajith Accident Video: तामिळ सुपरस्टार अजित कुमार (Ajit Kumar) यांच्याशी संबंधित एक मोठी बाब समोर आली आहे. अजित यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अजित यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.
अजित कुमार यांचा भीषण अपघात
अजित कुमार यांचा अपघात झाला असला तरी चिंतेची बाब नाही. हा व्हिडीओ मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातील आहे. अजित आपल्या विदा मुयारची या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. त्या दरम्यान हा अपघात झाला. सुरेश चंद्रा यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओनुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण वाळंवटात सुरू होते. अजित हे आपल्या सहकलाकाराला घेऊन वेगाने व्हिडीओ चालवत असतात आणि त्यातच त्यांची कार उलटते. हे दिसताच त्या ठिकाणी उपस्थित असलेला क्रू कलाकाराच्या कारच्या ठिकाणी धाव घेतात.
चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
या व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे. अजित कुमारच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. एका यूजरने लिहिले की, 'कृपया आमच्यासाठी ही सर्व जोखीम घेऊ नका.' तर दुसरा यूजर म्हणाला, 'अजित सर, आम्हाला तुमची काळजी वाटते, कृपया असे काही करू नका.
या चित्रपटाचे शूटिंग अझरबैजानमध्ये सुरू होते, जे आता पूर्ण झाले आहे. मागिज थिरुमेनी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या ॲक्शन चित्रपटात अजित व्यतिरिक्त त्रिशा, रेजिना कॅसँड्रा, अर्जुन सर्जा आणि आरव हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात दिसणार आहे
'विडा मुयर्ची'नंतर अजित कुमार 'गुड बॅड अग्ली'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. हा देखील एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाबाबत पोस्ट केली होती. या चित्रपटात अजित तिहेरी भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण पुढच्या वर्षी पोंगल 2025 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
