Samrenu : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'समरेणू'तील संत्याचे पोस्टर लॉंच
Samrenu : 'समरेणू' हा सिनेमा 13 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Samrenu : 'समरेणू' (Samrenu) सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. नुकतचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'समरेणू'तील संत्याचे पोस्टर लॉंच केले आहे. हा सिनेमा 13 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'समरेणू' सिनेमात 'संत्या' खलनायक असणार आहे. संत्याचे पात्र भरत लिमण साकारत असून तो प्रत्यक्षातही पैलवान आहे. महेश डोंगरे दिग्दर्शित 'समरेणू' या सिनेमात महेश डोंगरे, रुचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अजित पवार यांनी सिनेमासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे, 'समरेणू' या मराठी सिनेमाच्या 'संत्या' या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आहे. मराठी सिनेमात नवीन विषय हाताळणाऱ्या 'समरेणू' टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! सदर सिनेमा 13 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
महेश डोंगरेने 'समरेणू' सिनेमाच्या दिग्दर्शनाची आणि लेखनाची धुरा सांभाळली आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या सिनेमातील गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे.
संबंधित बातम्या























