एक्स्प्लोर

गलवान खोऱ्यातील शहीद जवानांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर, अजय देवगण चित्रपट बनवणार

गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीत शहीद झालेल्या भारताच्या 20 सैनिकांची शौर्यगाथा आणि पराक्रम मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण हा चित्रपट बनवणार आहे.

मुंबई : लडाखमधील गलवान खोऱ्या भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीवर लवकरच चित्रपट बनणार आहे. या झटापटीत शहीद झालेल्या भारताच्या 20 सैनिकांची शौर्यगाथा आणि पराक्रम मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण हा चित्रपट बनवणार आहे. चित्रपट समीक्षण आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.

तरण आदर्श यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीवर अजय देवगण चित्रपट बनवणार आहे. सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. चित्रपटात चिनी सैनिकांशी लढा देणाऱ्या भारताच्या 20 जवानांचं बलिदान आणि शौर्य दाखवलं जाईल. चित्रपटाली कलाकारही अजून निश्चित झालेले नाहीत."

15 जूनच्या रात्री चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर 40 पेक्षा जास्त चिनी जवानांना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या घटनेला 20 दिवस उलटून गेल्यानंतरही चिनी सरकारने अद्याप आपल्या सैनिकांच्या मृत्यूचा आकडा समोर ठेवलेला नाही. 1975 नंतर पहिल्यांदाच अशी हिंसक झटापट झाली आहे.

या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग एल एलपी संयुक्तरित्या करणार आहे. गलवान खोऱ्यातील घटनेवर आधारित या सिनेमा अजय देवगण स्वत: अभिनय करणार का? किंवा या सिनेमात आणखी कोणकोणते कलाकार दिसणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

अजय देवगणकडून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, अभिनेता आणि निर्माता अजय देवगण कायमच वीरगाथा सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. अजय देवगणने यापूर्वी 'एलओसी : करगिल', 'द लीजेंड ऑफ भगत सिंह', 'तान्हाजी:, 'सिंघम' आणि 'रेड' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तो गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांचा धीराने आणि नेटाने सामना करणाऱ्या 20 भारतीय सैनिकांच्या बलिदान आणि शौर्याची कहाणी लोकांसमोर आणणार आहे.

अजय देवगण लवकरच 'भुजः द प्राईड ऑफ इंडिया'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, एमी विर्क, प्रणिता सुभाष, शरद केळकर यांच्यासह अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. अभिषेक दुधैया हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि लेखक आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhoot Bangla: अक्षय कुमारचा 'भूत बंगला' OTT वर कधी रिलीज होणार? हवेलीतील हॉरर सिनेमाच रहस्य उलगडलं, चाहते खूश
अक्षय कुमारचा 'भूत बंगला' OTT वर कधी रिलीज होणार? हवेलीतील हॉरर सिनेमाच रहस्य उलगडलं, चाहते खूश
Raja Shivaji: रितेशचं भावूक भाषण, जिनिलियाचा हुंदका, कंठ दाटला, डोळ्यात पाणी; 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचमधील व्हिडिओ व्हायरल
रितेशचं भावूक भाषण, जिनिलियाचा हुंदका, कंठ दाटला, डोळ्यात पाणी; 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचमधील व्हिडिओ व्हायरल
Raja Shivaji: आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा.... राजा शिवाजीचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर
आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा.... राजा शिवाजीचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर
Deepika Padukone: पहिल्या प्रेग्नेंसीवेळी कल्कीतील भूमिकेसाठी शूट; दुसरं बाळ पोटात असताना दीपिका पदुकोण करणार 'हा' Action चित्रपट
पहिल्या प्रेग्नेंसीवेळी कल्कीतील भूमिकेसाठी शूट; दुसरं बाळ पोटात असताना दीपिका पदुकोण करणार 'हा' Action चित्रपट

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget