एक्स्प्लोर
Advertisement
तानाजी सिनेमात शिवाजी महाराज साकारण्यासाठी 'या' अभिनेत्याला ऑफर
'लोकमान्य एक युगपुरुष' या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत हे तानाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
मुंबई: तानाजी द अनसंग वॉरियर या तानाजी मालुसरेंच्या वीरगाथेवरील सिनेमाचं शूटिंग सुरु झालं आहे. या सिनेमात अजय देवगण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेच. मात्र अजयने यातल्या अत्यंत महत्वाच्या भूमिकेसाठी सैफ अली खानचं नाव सुचवलं आहे. ही भूमिका दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यामुळं या सिनेमात सैफ अली खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसायची शक्यता आहे.
'लोकमान्य एक युगपुरुष' या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत हे तानाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
या सिनेमात जितके तानाजी मालुसरे महत्त्वाचे आहेत, तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक शिवाजी महाराज त्याच ताकदीचे असणे आवश्यक आहे. त्यामुळेच अजय देवगणने शिवाजी महारांजाच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी सैफ अली खानला प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे.
सैफ अली खान या प्रस्तावावर गंभीरपणे विचार करत आहे. सैफ हा सिनेमा नाकारण्याची शक्यता खूपच कमी आहे. तर तानाजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका काजोल साकारण्याची चिन्हं आहेत.
EXCLUSIVE : नरवीर तानाजी मोठ्या पडद्यावर, दिग्दर्शक ओम राऊतशी गप्पा
तानाजी मालुसरे यांचं "आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' हे इतिहासात अजरामर झालेलं वाक्य सर्वांच्याच परिचयाचं आहे. भारताच्या दैदीप्यमान इतिहासात तानाजी मालुसरे यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं आहे. त्यांच्या जाण्याने छत्रपती शिवरायही हळहळले होते आणि ‘गड आला पण माझा सिंह गेला' असे भावनिक उद्गार काढले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा शूर मावळा तानाजी मालुसरे यांचा पराक्रम मोठ्या पदड्यावर पाहायला मिळणार आहे. पुढील वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होण्याची चिन्हं आहेत. या सिनेमाचं शूट सुरु झाल्याची माहिती अजय देवगणने ट्विटरद्वारे दिली.
या सिनेमाचं पोस्टर अजय देवगणने गेल्या वर्षी रिलीज केलं होतं.Taanaji Shoot Begins@TaanajiTheFilm pic.twitter.com/8lJnNDEWnA
— Ajay Devgn (@ajaydevgn) September 25, 2018
संबंधित बातम्या नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर EXCLUSIVE : नरवीर तानाजी मोठ्या पडद्यावर, दिग्दर्शक ओम राऊतशी गप्पाHe fought for his People, his Soil & his King Chhatrapati Shivaji. The unsung warrior of glorious Indian history, Subedar Taanaji Malusare. pic.twitter.com/3qTWvKdbol
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 19, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement