एक्स्प्लोर
सलमान ऑलिम्पिकचा सदिच्छादूत नको, ऐश्वर्या रायची याचिका
मुंबई : रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत म्हणून बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची निवड झाली आणि त्यावरुन विविध मतप्रवाह येऊ लागले. एकीकडे योगेश्वर दत्त, मिल्खा सिंग, गंभीर यासारख्या क्रीडापटूंनी विरोध केला असतानाच ऐश्वर्या रायचीही त्यात भर पडली आहे.
भारतातर्फे सलमानची रिओचा ऑलिम्पिक सदिच्छादूत म्हणून वर्णी लागू नये, यासाठी चेंज.ओआरजी (Change.org) यावर ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे. ऑनलाईन मोहीम सुरु करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे ऐश्वर्या राय.
'Ban Salman Khan from being Good Will Ambassador 2016 Rio Olympics,' अशा मथळ्याने ही याचिका सुरु करण्यात आली आहे. सलमानच्या निवडीमुळे आपली वाटचाल उलट दिशेने होईल आणि भारताची नकारात्मक प्रतिमा जगात तयार होईल, असा दावा करण्यात आला आहे. त्याला 200 जणांनी पाठिंबा दर्शवला आहे.
सलमानला महिलांवर अत्याचार करण्याची पार्श्वभूमी आहे, दुर्मीळ वन्यजीवांची शिकार आणि निष्पाप व्यक्तींचा थंड डोक्याने खून करण्याची वृत्ती असल्याचंही या याचिकेत म्हटलं आहे.
ही याचिकाकर्ता साक्षात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आहे, की केवळ तिच्याशी नामसाधर्म्य असलेली दुसरी व्यक्ती याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. ही याचिका तुम्ही इथे क्लिक करुन पाहू शकता
रिओ ऑलिम्पिकसाठी गुडविल अॅम्बेसेडर म्हणून सलमानची निवड झाल्यानंतर वडील सलीम खान त्याच्या बचावासाठी पुढे आले. सलीम खान यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत सलमानचा बचाव केला. “सलमान कोणत्याही स्पर्धेत सहभागी झाला नाही. मात्र, तो एक उत्तम जलतरणपटू, सायकलिस्ट आणि वेट लिफ्टर आहे.”, असा ट्वीट सलीम खान यांनी केला आहे.
सलमान खानची रिओ ऑलिम्पिकच्या गुडविल अँबेसेडरपदी निवड झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पैलवान योगेश्वर दत्तने विरोध केला होता. त्यानंतर मिल्खा सिंग यांनीही विरोध केला.
संबंधित बातम्या :
सलमान नाही योगेश्वर खरा हिरो : अनिल विज
रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत सलमानवर योगेश्वर दत्तचे ताशेरे
ऑलिम्पिक अॅम्बेसेडर वाद : सलमानच्या बचावासाठी सलीम खान मैदानात
रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना ‘सुलतान’ची साथ!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement