Aindrila Sharma: अँड्रिलाला शेवटचं पाहताना प्रियकराचा भावनांचा बांध फुटला; व्हायरल व्हिडीओनं चाहतेही स्तब्ध
अँड्रिलाच्या (Aindrila Sharma) निधनानं बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. अँड्रिलानं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Aindrila Sharma Sabyasachi Chowdhury: अभिनेत्री अँड्रिला शर्माचं (Aindrila Sharma) 20 नोव्हेंबर रोजी निधन झालं. तिनं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अँड्रिलाची प्रकृती चिंताजनक होती. तिला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कार्डियेक अरेस्ट आल्यानं अँड्रिला शर्माचं निधन झालं. अँड्रिलाच्या निधनानं बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अँड्रिलाचा प्रियकर सब्याचीसा चौधरी हा अँड्रिलाला अखेरचा निरोप देताना दिसत आहे.
अँड्रिला आणि सब्यासाची चौधरी हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सब्यासाची हा अँड्रिलाच्या पार्थिवाकडे एकटक बघत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भावूक झाले.
1 नोव्हेंबरला अँड्रिला शर्माला ब्रेन स्ट्रोक आला. यानंतर अँड्रिलाची प्रकृती बिघडली त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर, 14 नोव्हेंबर रोजी अँड्रिलाला मल्टिपल कार्डिॲक अरेस्ट आले, ज्यामुळे अँड्रिलाची तब्येत आणखी खालावली. अँड्रिलानं कोलकातामधील नारायण सुपरस्पेशलिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
अँड्रिलानं अनेक मालिकांमध्ये तसेच वेब सीरिजमध्ये काम केलं. तिनं 2007 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. झुमर या मालिकेमधून तिनं छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. जिओं काठी', 'जीवन ज्योती' यांसारख्या मालिकांमध्ये तिनं काम केलं. तसेच तिनं वेब सीरिजमध्ये देखील काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: