एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नरेंद्र मोदींनंतर आता राहुल गांधींवरील बायोपिक लवकरच प्रदर्शित होणार
'माय नेम इज रागा' असं या सिनेमाचं नाव असून लोकसभा निवडणुकीदरम्यान या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता.
मुंबई : 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या जीवनावरील सिनेमादेखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. 'माय नेम इज रागा' असं या सिनेमाचं नाव असून लोकसभा निवडणुकीदरम्यान या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. या सिनेमाचा टिजर याआधीच प्रदर्शित झाला आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे प्रदर्शन लांबवलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा 24 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर लगेचच आता राहुल गांधींच्या जीवनावरील बायोपिक देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी हा सिनेमा प्रदर्शित करण्याची दिग्दर्शकाची इच्छा होती. मात्र निवडणूक आयोगाने तशी परवानगी दिलेली नव्हती. निवडणूक आयोगाने 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमासह 'माय नेम इज रागा'चंही प्रदर्शन लोकसभा निवडणूक काळात थांबवलं होतं. परंतू निवडणूक आयोगापेक्षा राहुल गांधींच्या समर्थकांचा या सिनेमाला जास्त विरोध होता असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. 'राहुल गांधींच्या समर्थकांनी मोदींच्या भितीमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. मात्र आता ती भिती संपली आहे', असं त्यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement