अक्षय कुमार, अजय देवगणनंतर विकी कौशलही दिसणार ‘INTO THE WILD’ शोमध्ये
Vicky Kaushal's Into The Wild With Bear Grylls: 12 नोव्हेंबर रोजी विकी कोशल आणि बेअर ग्रील्स याचा एपिसोड प्रसारित होणार आहे.
Vicky Kaushal's Into The Wild With Bear Grylls: जंगलामधून अथवा बेटावरून कोणत्याही यंत्राचा वापर न करता बाहेर पडून दाखवणारा बेअर ग्रील्स तुम्हाला माहित असेलच. त्याच्या ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अनेक प्रसिद्ध व्यक्तिंनी बेअर ग्रील्सच्या शोमध्ये सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रजनीकांत अक्षय कुमार आणि अजय देवगण याच्यानंतर आता ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोमध्ये बॉलिवूडचा उरी फेम विकी कौशल हजेरी लावणार आहे. विकी कौशल यानं इन्स्टाग्राम पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. 12 नोव्हेंबर रोजी विकी कोशल आणि बेअर ग्रील्स याचा एपिसोड प्रसारित होणार आहे.
विक्की कौशल (Vicky Kaushal) सध्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत आहे. कतरिना कैफसोबतच्या लग्नाच्या चर्चांमुळे विकी कौशलनं लक्ष वेधलं आहे. तसेच त्याचा अखेरचा चित्रपट सरदार उधमने (Sardar Udham) मनं जिंकली होती. आता विकी कौशल बेअर ग्रील्ससोबत ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
रजनिकांत आणि पंतप्रधान मोदींनीही घेतला सहभाग
अक्षय कुमार या शोमध्ये सहभागी होणारा पहिला बॉलिवूड स्टार आहे. नुकतेच अजय देवगण यानेही या शोमध्ये हजेरी लावली होती. याआधी सुपरस्टार रजनिकांत यांनीही बेयर ग्रिल्ससोबत मॅन वर्सेस वाइल्डमध्ये सहभाग घेतला आहे. एवढचं नाहीतर पंतप्रधान मोदीही सहभागी झाले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी येथे समावेश झाल्यामुळे विरोधकांनी अनेक आरोप-प्रत्यारोप केले आहेत.