एक्स्प्लोर
Advertisement

आठव्या मजल्यावरुन ढकलल्याने जखमी अभिनेत्रीला मदत करा, सनी लिओनचं आवाहन
लैंगिक गैरवर्तन करुन आठव्या मजल्यावरुन ढकलल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील अल्पवयीन अभिनेत्रीला उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हिने केलं आहे.

मुंबई : मुंबईतील एका अल्पवयीन अभिनेत्रीशी लैंगिक गैरवर्तन करुन तिला आठव्या मजल्यावरुन ढकलल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्यानंतर या अभिनेत्रीला उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हिने केलं आहे. यानिमित्ताने सनीचं सामाजिक भान पुन्हा अधोरेखित होत असल्याच्या भावना नेटिझन्सनी व्यक्त केल्या आहेत.
सनीने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पीडितेचा फोटो आणि माहिती शेअर केली आहे. 'या मुलीला जगण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. मी तिला ओळखत नाही, पण तिची गोष्ट ऐकून माझं मन हेलावलं. तुम्ही तिला मदत करु शकलात, तर उत्तम. आर्थिक मदत शक्य नसल्यास ही पोस्ट शेअर करा. या तरुणीसोबत लैंगिक गैरवर्तन करुन 29 जून रोजी तिला इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन ढकलून देण्यात आलं होतं. तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. एल एच हिरानंदानी रुग्णालयात ती जगण्यासाठी संघर्ष करत आहे. उपचारांसाठी आठ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी तातडीने आठ लाखांची गरज आहे. आम्ही हरप्रकारे पैसे उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. पण हातातून वेळ निसटून जात आहे. कृपया दान करुन आर्थिक मदत उभी करण्यास हातभार लावा.' असं सनीने लिहिलं आहे.
सनीने उचललेल्या या कौतुकास्पद पावलाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. यापूर्वी सनीने किडनीच्या आजाराने त्रस्त तिच्या स्टाफ मेंबरला मदत करण्याचं आवाहनही केलं होतं. सनीने लातूरमधील चिमुरडीला दत्तक घेतल्यामुळे आधीच ती अनेकांसाठी आदर्श ठरली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
