Suchitra Krishnamoorthi Attends Nude Party : नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
Suchitra Krishnamoorthi Attends Nude Party : अभिनेत्री सुचित्रा कृष्ममूर्ती ही सध्या युरोपमध्ये व्हेकेशनवर आहे. या दरम्यान तिने जर्मनीतील बर्लिनमध्ये 'नेकेड पार्टी'ला हजेरी लावली. मात्र, काही मिनिटांतच तिथून पळ काढला.
Suchitra Krishnamoorthi Attends Nude Party : परदेशात काही घटना, गोष्टी भारतीयांसाठी विचित्र ठरणाऱ्या असतात. मात्र,अनेकदा त्या विचित्र वाटणाऱ्या गोष्टी ट्राय केल्याचा मोह अनेकांना आवरत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. भारतीय अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (Suchitra Krishnamoorthi ) हिच्याबाबतही अशीच काहीशी घटना घडली आहे. अभिनेत्री सुचित्रा कृष्ममूर्ती ही सध्या युरोपमध्ये व्हेकेशनवर आहे. या दरम्यान तिने जर्मनीतील बर्लिनमध्ये 'नेकेड पार्टी'ला हजेरी लावली. मात्र, तिने या दरम्यान आलेला वाईट अनुभव शेअर केला.
नेकेड पार्टीत नेमकं काय झाले?
बॉलिवूड हंगामा सोबत बोलताना सुचित्रा कृष्णमूर्तीने सांगितले की माझ्यासाठी हा वाईट अनुभव होता. मी त्या पार्टीत एन्जॉय नाही केले. सुचित्राने पुढे म्हटले की, या सगळ्या गोष्टी तिथे अगदी कॉमन आहेत. शरीराच्या पॉझिटिव्हीटीला प्रोत्साहन देणे याला ते महत्त्व देतात. मला वाटले एक अनुभव घेऊया. ही पार्टी एका बारमध्ये होत होती, जो एका मित्राचा होता. मी पाहुण्यांच्या यादीत होते. मी तिथे गेली आणि लगेच पळून गेले. मी खूपच देसी आहे, मला कोणाचाही प्रायव्हेट पार्ट पाहण्यात रस नाही असेही तिने सांगितले.
Just attended a body positivity/ naked party in Berlin.
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) July 13, 2024
Reminded me of the quote : dont be so open minded that ur brains fall out.
Desi girl forever. Need a sĥower & some gayatri mantra chanting . Baapre 🙃
सुचित्राने पुढे सांगितले की, अशी पार्टी ही चांगल्या विचारांसह होते. आनंद आणि पॉझिटिव्हीसाठी होत असते. ही पार्टी मुळीच वल्गर नव्हती. मात्र, भारतीय असल्याने आपल्यामध्ये शरिराबाबत कॉन्शियसपणे मोठ्या केल्या आहेत.
अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती या पार्टीत 20 मिनिटे होती. ही पार्टी पूर्ण रात्रभर सुरू होती.
''आंघोळ करण्याची आवश्यकता आहे...''
सुचित्रा कृष्णमूर्तीने एक्स प्लॅटफॉर्मवर याबाबत सांगितले की, मी नुकतीच बर्लिनमध्ये बॉडी पॉझिटिव्हीटी/नेकेड पार्टी अटेंड केली. मला एक म्हण आठवली, ती म्हणजे इतक्याही मोकळ्या विचारांचे होऊ नका की तुम्हीच उघडे पडाल. मी नेहमीच देसी गर्ल राहिली आहे. आता आंघोळ करून गायत्री मंत्राचा जाप करण्याची आवश्यकता असल्याचे तिने सांगितले.
सुचित्राने याबाबत आपल्या मुलीलादेखील सांगितले नाही. माझी मुलगी कावेरीला मी अशा पार्टीला गेलीय याबाबत काहीच सांगितले नाही. मात्र, तिला याबाबत काही सांगितले तर ती नक्कीच चिलआउट राहिल, असेही सुचित्राने सांगितले. मी असे काही केले आहे हे ऐकून ती खूश होईल. भले मी 20 मिनिटात पळून आले. पण, कमीत कमी तिथे जाण्याचा प्रयत्न तरी केला असेही सुचित्राने सांगितले.