एक्स्प्लोर
मुंबईत अभिनेत्रीचा रस्त्यावर राडा, पोलिसाच्या वर्दीवरील नेमप्लेटही काढली
दारुच्या नशेत असलेल्या अभिनेत्री रुही सिंहने तिच्या कारने इतर गाड्यांना धडक दिली. यात चार दुचाकी आणि तीन कारचं नुकसान झालं.

मुंबई : मॉडेल रुही सिंहने सोमवारी रात्री सांताक्रुझमध्ये दारुच्या नशेत चार दुचाकी आणि तीन कारना धडक दिली. एवढंच नाही तर तिथे राडा करत एका पोलिस कॉन्स्टेबलच्या वर्दीवरील नावाचा बॅचही काढला. तिच्यावर सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दोनच्या सुमारास राहुल आणि स्वप्नील या मित्रांसह 30 वर्षीय रुही आपल्या कारने घरी परतत होती. लिंकिंग रोडवर पोहचल्यानंतर तिघांपैकी एकाला फूड आऊटलेटमधील वॉशरुममध्ये जायचं होतं. पण आऊटलेट बंद असल्याचं सांगत स्टाफने त्यांना जाऊ दिलं नाही. यानंतर तिघांनी तिथे गोंधळ घालायला सुरुवात केली. दारुच्या नशेत असलेल्या रुहीने तिच्या कारने इतर गाड्यांना धडक दिली. यात चार दुचाकी आणि तीन कारचं नुकसान झालं. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही. स्टाफपैकी एकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पेट्रोलिंग करणारी पोलिसांची व्हॅन तिथे दाखल झाल्यानंतर त्यांनी या वादात हस्तक्षेप केला. पण तिघांनी पोलिसांसोबतही वाद घालण्यास सुरुवात केली. रुहीने एका पोलिसाच्या नावाचा बॅच काढला. यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. स्वप्नील आणि राहुलला तातडीने अटक करण्यात आली. मात्र रात्र झाल्याने रुहीवर अटकेची कारवाई केली नाही.
आणखी वाचा























