एक्स्प्लोर
'घरवाली बाहरवाली' फेम अभिनेत्री रंभाकडे गुड न्यूज
रंभाने आपल्या बेबी बम्पसह एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
!['घरवाली बाहरवाली' फेम अभिनेत्री रंभाकडे गुड न्यूज Actress Rambha is pregnant and flaunting her baby bump latest update 'घरवाली बाहरवाली' फेम अभिनेत्री रंभाकडे गुड न्यूज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/23235647/Rambha.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : तामिळ चित्रपटातील कोणे एके काळचा आघाडीचा चेहरा, 'घरवाली बाहरवाली', बंधन, जुडवा यासारख्या चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये गाजलेली अभिनेत्री रंभाकडे गुड न्यूज आहे.
रंभाने आपल्या बेबी बम्पसह एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आपण तिसऱ्यांदा आई होत असल्याचा आनंद 39 वर्षीय रंभाने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
रंभाने काही वर्षांपूर्वी तमिळ चित्रपटसृष्टी गाजवली होती. कमल हसन, रजनीकांत यासारख्या आघाडीच्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत ती झळकली होती. काही वर्षांपूर्वी तिने सिनेसृष्टीतून संन्यास घेतला. त्यानंतर ती काही डान्स शोजमध्ये दिसली.
आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन रंभाने चाहत्यांना केलं आहे. कॅनडियन व्यावसायिक इंद्रन पाथमनथनसोबत रंभा 2010 मध्ये विवाहबंधनात अडकली होती. त्यांना लान्या आणि साशा ही दोन मुलं आहेत. रंभाने काही वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी कोर्टातही धाव घेतली होती, मात्र सुदैवाने दोघांमधील दुरावा आणि मतभेद दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)