करीनानंच सांगितलेलं करिष्माच्या चिरतरुण सौंदर्याचं गुपित; उघड केले घरगुती उपाय
अभिनेत्री करीना कपूर आणि करिष्मा कपूर या हिंदी कलाविश्वातील दोन गाजलेल्या अभिनेत्री आणि सतत चर्चेत असणारी सख्ख्या बहिणींची जोडी. करीना आणि करिष्मा यांच्यात मोठी बहीण कोण हाच प्रश्न अनेकदा चाहत्यांना पडतो.
मुंबई : अभिनेत्री करिष्मा कपूर ही गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. असं असलं तरीही ती अनेक कार्यक्रम, सोहळ्यांना मात्र आवर्जून हजेरी लावते. मुख्य म्हणजे एकेकाळी स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी हीच करिष्मा आतासुद्धा तिच्या अनोख्या अंदाजानं सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळवते. सौंदर्याच्या बाबतीत करिष्मा कित्येकदा करीनालाही मागे टाकते.
एका लग्नाची दशकपूर्ती; अभिनेता अल्लू अर्जुनने शेअर केले खास फोटो
बी- टाऊनमधील या दोन्ही सौंदर्यवती एकत्र असतात तेव्हा नेमकी यांच्यातील मोठी बहीण कोण, या प्रश्नाचं उत्तर देणं अनेकांनाच जमत नाही. खरंतर करिष्मा ही करीनापेक्षा वयानं 6 वर्षांनी मोठी आहे. पण, सौंदर्याच्या बाबतीत मात्र करिष्मा सर्वांनाच मागे टाकते. आता तिच्या या सौंदर्याचं गुपित काय, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?
करीनानं उघड केलेलं गुपित...
एका मुलाखतीमध्ये खुद्द करीनानंच करिष्माच्या सौंदर्याचं गुपित सर्वांनाच सांगितलं होतं. करिष्मा बदामाचं तेल आणि दही असं मिश्रण चेह्याला लावते, ज्यामुळं तिची त्वचा नितळ, मऊ आणि चमकदार दिसते असं तिनं सांगितलं होतं.
जवळपास 30 मिनिटांसाठी हे मिश्रण चेहऱ्यावर राहू दिल्यानंतर चेहरा धुवून ती चेहऱ्याचा मॉइश्चरायझर लावते. करिष्मानंही आपण त्वचेच्या सौंदर्यासाठी तीन गोष्टी जरुर पाळतो असं सांगितलं होतं. क्लींजिंग, एक्सफोलिएशन आणि मॉइश्चराइजेशन हे तीन टप्पे ती कायम लक्षात ठेवते. शिवाय बदलत्या ऋतूचक्रानुसार सौंदर्याच्या बाबतीतील सवयीही बदलल्या पाहिजेत असं ती न विसरता सांगते.
कशी आहे करिष्माची दिनचर्या.....
पाणी पिण्यापासून करिष्माच्या दिवसाची सुरुवात होते. ज्यानंतर ती आरोग्यदायी ब्रेकफास्ट अर्थात न्याहारी करते. संतुलित आहाराला ती कायम प्राधान्य देते. नाश्त्यामध्ये अंडी, फळं आणि टोस्ट खाण्याला तिची पसंती असते. तर, केळं, किवी आणि आंबा ही फळंही तिच्या विशेष आवडीची. विविध प्रकारच्या बेरी खाणंही करिष्मा पसंत करते.
खाण्याच्या सवयींसोबतच व्यायामालाही ती कायमच प्राधान्य देते. दिवस कितीही व्यग्र असला तरीही व्यायाम करणं ती कधीही टाळत नाही. यामध्ये योगसाधनेचाही तिनं समावेश केला आहे. शरीर आणि आरोग्य याकडे करिष्मा काटेकोरपणे लक्ष देत निरोगी आयुष्य जगते.