एक्स्प्लोर
अभिनेत्री नेहा धुपियाच्या कारला अपघात
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या कारला चंदीगडमध्ये अपघात झाल्याचं वृत्त समजतं आहे.
![अभिनेत्री नेहा धुपियाच्या कारला अपघात Actress Neha Dhupias Car Accident In Chandigarh Latest Update अभिनेत्री नेहा धुपियाच्या कारला अपघात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/11160918/Actress-neha-dhupia.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
चंदीगड : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या कारला आज (शुक्रवार) चंदीगडमध्ये अपघात झाल्याचं वृत्त समजतं आहे. विमानतळावर जात असताना तिच्या कारला अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नाही. 'नो फिल्टर नेहा' या शोच्या प्रमोशनसाठी नेहा चंदीगडला आली होती.
या अपघातामुळे रस्त्यावर मात्र वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी नेहा धुपिया तब्बल तासभर रस्त्यालगतच उभी होती. सुदैवानं या अपघातात नेहा धुपिया किंवा तिच्या टीममधील कुणीही जखमी झालं नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार, नेहाच्या खांद्याला छोटीशी दुखापत झाली आहे.
या अपघातनंतर नेहाला मदत करण्याऐवजी लोकांनी थेट तिच्यासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. तर काही जणांनी ऑटोग्राफही घेतली.
'नो फिल्टर नेहा' हा एक ऑडिओ चॅट शो आहे. जो चंदीगड आणि आसपासच्या भागात बराच प्रसिद्ध आहे. या शोमध्ये नेहा सिनेजगतातील आपल्या काही खास मित्रांशी चॅट करते. त्यावेळी ती अशा काही गोष्टी सांगते की, ज्या आजवर आपण ऐकलेल्या नाहीत. या शोचा पहिला सीजन बराच हिट झाला होता. आता या शोचं दुसरं पर्व येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)