एक्स्प्लोर
अभिनेत्री जयंतीच्या निधनाची बातमी ही निव्वळ अफवा : कुटुंबीय
श्वसनाचा त्रास सुरु झाल्यानंतर जयंती यांना बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात करण्यात आलं होतं, जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला.
नवी दिल्ली : कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जयंती यांच्या निधनाची बातमी ही अफवा असल्याचं स्पष्टीकरण कुटुंबीयांनी दिलं आहे. श्वसनाचा त्रास सुरु झाल्यानंतर जयंती यांना बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात करण्यात आलं होतं, जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला.
जयंती यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचंही बोललं जात होतं. मात्र हे सर्व वृत्त कुटुंबीयांना फेटाळले आहेत. शिवाय ही अफवा नेमकी कशी पसरली याबाबत आपण चिंतेत आहोत, असंही कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
जयंती यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना धक्काच बसला होता. चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजलीही वाहिली. मात्र सध्या जयंतीच्या यांच्यावर उपचार सुरु असून त्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती आहे.
जंयती क्रोनिक या गेल्या तीन दशकांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त आहेत. रविवारी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 500 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement