एक्स्प्लोर
म्हणून गुल पनागने बाळाबाबत सहा महिने गुपित पाळलं!
ऋषी आणि मी आमची प्रायव्हसी जपण्याचं ठरवलं होतं. लोकांचं लक्ष वेधून घेण्याऐवजी वैयक्तिक आनंद घेण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं गुल सांगते.
मुंबई : अभिनेत्री गुल पनागने सहा महिन्यांपूर्वीच बाळाला जन्म दिला. मात्र आपलं वैयक्तिक आयुष्य जपण्यासाठी तिने ही गोष्ट जगजाहीर केली नाही.
आजकाल बाळाचा जन्म होत नाही, तोच त्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची घाई आई-वडिलांना लागलेली असते. गुल पनागने मात्र हा प्रकार जाणीवपूर्वक टाळला.
सहा महिन्यांपूर्वी गुलच्या बाळाचा जन्म झाला. त्यावेळी बाळ प्रिमॅच्युअर होतं. त्याचं निहाल असं नामकरण करण्यात आलं. मात्र मित्र आणि नातेवाईक यांनाच ही गोष्ट माहित होती. सर्वांनीच गुलचं हे गुपित पाळून ठेवलं.
'पालकत्व हा आगळावेगळा अनुभव असतो. ऋषी आणि मी आमची प्रायव्हसी जपण्याचं ठरवलं होतं. लोकांचं लक्ष वेधून घेण्याऐवजी वैयक्तिक आनंद घेण्याचा निर्णय आम्ही घेतला' असं गुल सांगते.
जेव्हा एखाद्या स्त्रीला आपल्या आयुष्यात बाळ यावं, असं वाटतं, तेव्हाच तिने आई होण्याचा निर्णय घ्यावा. समाज आणि कुटुंबीय मागे लागत आहेत, म्हणून मातृत्व अनुभवण्यात काय हशील? असा प्रश्न गुल विचारते.
39 वर्षीय गुल पनागने डोर, हेलो, मनोरमा सिक्स फीट अंडर यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत ती 'आप'कडून चंदिगढमधून उमेदवार होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement