पीएम नरेंद्र मोदी प्रदर्शित व्हावा यासाठी विवेक ओबेरॉयचं साईचरणी साकडं
आक्षेप घेणारे राहुल गांधी, राज ठाकरे, उर्मिला मातोंडकर, विशाल भारद्वाज या सर्वांना हा चित्रपट पाहाण्याच आवाहन विवेकने केलं आहे.

शिर्डी : अभिनेता विवेक ओबेरॉय स्टारर 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी सिनेमाच्या टीमने साईचरणी साकडं घातलं. अभिनेता विवेक ओबेरॉय , निर्माते संदीप सिंह , मनीष आचार्य यांनी साई दरबारी जाऊन साईबाबांना प्रार्थना केली.
ओमंग कुमार दिग्दर्शित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदर त्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली. 22 एप्रिल रोजी या प्रकरणी कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी अभिनेता विवेक ओबेरॉय आणि निर्मात्यांनी शिर्डीच्या साईबाबांना साकडं घातलं.
पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट संघर्षाची कहानी आहे. चित्रपटाच्या ट्रेलर पाहून भ्रमित न होता विरोध करणाऱ्यांनी आधी आमच्यासोबत चित्रपट पाहावा. आक्षेप घेणारे राहुल गांधी, राज ठाकरे, उर्मिला मातोंडकर, विशाल भारद्वाज या सर्वांना हा चित्रपट पाहाण्याच आवाहन विवेकने केलं आहे.
दरम्यान विवेकला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. 'मोदी मोदी' अशा घोषणा देत चाहते विवेकसोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी धडपड करताना दिसून आले.
VIDEO | महाराजांच्या गडावर अमोल कोल्हेंवर शिवसेनेकडून गंभीर आरोप | स्पेशल रिपोर्ट |
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















