एक्स्प्लोर
'चंदा मामा दूर के' साठी सुशांत सिंग राजपूतचं 'नासा'त ट्रेनिंग
'लहान रॉकेटपासून सुरु झालेला प्रवास भव्य अंतराळयानापर्यंत. माझ्या आईची नेहमीच मला अवकाशात पाहण्याची इच्छा होती.' असं सुशांतने ट्विटरवर म्हटलं होतं.
मुंबई : 'चंदा मामा दूर के' या आगामी चित्रपटासाठी अभिनेता सुशांत सिंग राजपूत सज्ज झाला आहे. सुशांत या
सिनेमात अंतराळवीराची भूमिका साकारणार अशून त्यासाठी त्याला थेट 'नासा'मध्ये ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
नासामध्ये स्पेशल ट्रेनिंग होणारा हा पहिलाच बॉलिवूडपट ठरला आहे.
सुशांतने व्हाईट स्पेससूट घातलेले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. 'खऱ्याखुऱ्या अंतराळवीरांना अत्यंत कठीण प्रशिक्षण दिलं जातं. तुमचा अनुभव, कौशल्य आणि एकाग्रता पणाला लागते. त्याचवेळी तुम्हाला ताण घेऊन चालत नाही. ही पास किंवा फेल स्थिती नसते, तर जीवन किंवा मरणाचा प्रश्न असतो.' असं सुशांत म्हणतो.
जुलै महिन्यात सुशांतने यूएसमधील नासा सेंटरला भेट दिली होती. तिथे झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव त्याने घेतला. 'लहान रॉकेटपासून सुरु झालेला प्रवास भव्य अंतराळयानापर्यंत. माझ्या आईची नेहमीच मला अवकाशात पाहण्याची इच्छा होती.' असं सुशांतने ट्विटरवर म्हटलं होतं. सुशांतला मूनवॉक, अंतराळात चालण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
https://twitter.com/taran_adarsh/status/892600878670139392
https://twitter.com/itsSSR/status/889131543956004864
संजय पुरण सिंग चौहान यांचं दिग्दर्शन असलेल्या 'चंदा मामा दूर के' चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दिकी, आर माधवन यांच्याही भूमिका आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement