एक्स्प्लोर

अभिनेते प्रकाश राजकडून 1 रुपयाचा मानहानीचा खटला

सिंघम फेम अभिनेते प्रकाश राज यांनी भाजप खासदार प्रताप सिन्हा यांच्याविरोधात एक रुपयाचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला.

मुंबई : सिंघम चित्रपटातील गाजलेला व्हिलन, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी भाजप खासदाराला कोर्टात खेचलं आहे. प्रकाश राज यांनी खा. प्रताप सिन्हांवर मानहानीचा खटला दाखल केला असून हा दावा केवळ एक रुपयाचा आहे. आपली बदनामी केल्याचा आरोप करत प्रकाश राज यांनी भाजप खासदार प्रताप सिन्हा यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. विशेष म्हणजे नुकसानभरपाई म्हणून प्रकाश राज यांनी केवळ एका रुपयाची मागणी केली आहे. कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचा खटला दाखल केल्याची माहिती प्रकाश राज यांचे वकील एम. महादेव स्वामी यांनी दिली. 3 मार्च रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. प्रकाश सिन्हांनी ऑक्टोबर 2017 मध्ये सोशल मीडियावर प्रकाश राज यांच्याशी संबंधित काही पोस्ट लिहिल्या होत्या. या पोस्ट अपमानकारक असल्याचं सांगत प्रकाश राज यांनी नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितलं होतं. खासदार सिन्हांनी नोटीसला काहीच उत्तर न दिल्यामुळे नाईलाजास्तव प्रकाश यांना कोर्टाची पायरी चढावी लागत आहे, असं त्यांचे वकील एम. महादेव स्वामी यांनी म्हटलं आहे. प्रकाश राज यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टिप्पणी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर प्रकाश राज यांच्यावर टीका झाली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan First Post After Affair Rumours With Thalapathy Vijay: विजय थलपतीसोबत दिसल्यानंतर अफवांना उधाण, त्रिशा कृष्णननं शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली...
विजय थलपतीसोबत दिसल्यानंतर अफवांना उधाण, त्रिशा कृष्णननं शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली...
Prithvi Shaw Engagement With Girlfriend Akriti Agarwal: इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Embed widget